Dailyhunt
कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू.

कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू.

हिंगोली : हिंगोलीच्या डिग्रस वाणी ते सिरसम रस्त्यावर दुचाकीला झालेल्या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

दुचाकीवरून तिघेजण सिरसम येथे रुग्णालयात जात असताना ही दुर्घटना घडली आहे. कुंडलिक जाधव, आकाश जाधव व कलावती जाधव अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दुचाकीवरुन जात असताना रात्रीच्या अंधारात रस्त्याचा अंदाज न आल्याने दुचाकी नाल्यात गेली. या अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, अपघात झाल्याची माहिती ग्रामस्थांना समजली आणि त्यांनी ही माहिती पोलिसांना कळवली. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले असून, पुढील तपास करत आहेत.

The post कुटुंबच संपलं! दुचाकी अपघातात आई-वडिलांसह मुलाचा मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka