Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! 'ऑपरेशन सिंदूर'साठी माझं कुंकू पाठवतेय.

लग्न झालेल्या जवानाला सीमेवरून बोलावणं! 'ऑपरेशन सिंदूर'साठी माझं कुंकू पाठवतेय.

ळगाव: जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 पर्यटकांचा जीव घेतला. याचाच बदला भारताना पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करून घेतला. भारत-पाकिस्तान सीमेवर सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार सुरू आहे.

जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून, त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी सुट्टी रद्द झाल्याने नवरवर देशासाठी बॉर्डवर हजर झाला. त्यानंतर नववधूने ‘ऑपरेशन सिंदूर’साठी माझं कुंकू पाठवतेय, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यातील मनोज पाटील देशसेवेच्या कार्यासाठी भारतीय सैन्यात भरती झाले. 5 मे रोजी मनोज पाटील यांचे लग्न झालं. लग्नाला दोन दिवस उलटत नाहीत, तोवर भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करुन त्यांना तात्काळ ऑन ड्युटी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. पाच तारखेला लग्न झाल्यानंतर दोन दिवसांत मनोज पाटील देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर रवाना झाले आहेत. अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोज पाटील देशाच्या रक्षणासाठी तैनात झाले आहेत. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी कर्तव्यावर हजर झाल्यामुळे मनोज पाटील सध्या चर्चेत आहेत.

जवान मनोज पाटील यांचे यामिनी यांच्याशी 5 मे रोजी लग्न झाले. पाचोरा येथे लग्न सामारंभ आटोपत नाही, तोच मनोज यांस कर्तव्याच्या ठिकाणी त्वरित बोलावणे आले आणि त्यांना जावे लागले आहे. मनोज यांनी आपल्या अर्धांगिनीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला. देशसेवेसाठी अंगावरची ओली हळद आणि हातावर रंगलेली मेहंदी घेऊन मनोज आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी रवाना झाले. मनोज यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयामुळे सर्वत्र कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka