Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध.

लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने घेतला गळफास; पत्नीचे प्रेमसंबंध.

बीड : लग्न होऊन अवघे १२ दिवस झाले असतानाच गणेश दत्तू कोळी या तलाठी युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती.

आता या प्रकरणी गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी यांच्या फिर्यादीवरून पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे.

आईने दिलेल्या फिर्यादीत लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचे वागणे संशयास्पद वाटू लागले. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र पत्नीचे वागणे बदलले. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचे सांगत गणेश सोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली. गणेश २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

गणेश हा २०२१ मध्ये राज्य राखीव पोलिस बलात पोलिस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून २०२४ मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. १३ मे रोजी गणेश दत्तू कोळी याचा विवाह बीड येथील तरुणीशी मोठ्या उत्साहात पार पडला. गणेशची पत्नी ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. अवघ्या १२ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या एका तरुण तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोरेवाडी परिसरात उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश कोळीची पत्नी अंबाजोगाई येथील अप्पर पोलिस अधीक्षक कार्यालयातील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहे. घटनेच्या वेळी पत्नी ड्युटीवर गेली असताना गणेश यांनी खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. गणेश कोळी यांनी टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…

कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

विवाहित महिलेशी प्रेमसंबंध अन् आत्महत्या; पाहा WhatsApp स्टेटस मेसेज…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka