Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्.

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्.

पुणे : लष्करातून निवृत्त झालेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ३ लाख ७४ हजार रुपये ट्रान्स्फर करायला लावल्याची घटना ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने घडली आहे.

याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लष्करातून निवृत्त झाले असून ते वाघोली परिसरात राहायला आहेत. अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हिडीओ आला होता. व्हिडिओ कॉल उचलल्यानंतर समोर एक युवती कपडे काढत होती. संबंधित दृष्य पाहून फिर्यादी यांनी तत्काळ व्हिडीओ कॉल बंद केला. मात्र सायबर चोरट्याने तो व्हिडीओ कॉल रेकॉर्ड करून, व्हायरल करण्याची धमकी देऊन फिर्यादी यांना पैशाची मागणी केली. परंतु, फिर्यादी यांनी पैसे देण्यास नकार दिला.

सायबर चोरट्याने वेगळ्या क्रमांकावरून फोन करून दिल्ली पोलिस मधून बोलत असल्याचे सांगितले. व्हिडीओ आक्षेपार्ह असून सोशल मीडियावर व्हायरल झाला तर खूप बदनामी होईल त्यामुळे तत्काळ ते व्हिडिओ डिलीट करून घ्या असे सांगितले. व्हिडीओ डिलिट करण्यासाठी वेळोवेळी ३ लाख ७४ हजार २३२ रुपये ट्रान्स्फर करायला भाग पाडले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे शहरातील आजोबा कॉल गर्लला भेटले अन् पुढे…

मोबाईलवर बनावट स्क्रीनशॉट दाखवून बंटी-बबली करायचे फसवणूक…

माझं नाव टीना आहे, तू माझ्याशी मैत्री करशील का?

युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…

सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…

The post लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka