Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच.

लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच.

पुणे (संदीप कद्रे): लोणावळा विभाग, पुणे ग्रामीण चे उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहा. पोलिस अधिक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासुन अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणा-या गुन्हेगारांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या आहेत.

कामशेत पो.स्टे हद्दीतील मौजे बकुसगाव येथील एका पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये १०/१२/२०२३ रोजी काही व्यक्ती हे अवैधरित्या जुगार मटका खेळत असल्याची बातमी गुप्त बातमीदारामार्फत सहा. पोलिस अधिक्षक श्री सत्यासाई कार्तिक यांना मिळाली होती. त्यानंतर सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग व कामशेत पोलिस स्टेशनच्या पथकाने शिताफीने सापळा रचून केलेल्या संयुक्त कारवाईत मौजे कुसगाव (ता. मावळ जि. पुणे) गावच्या हद्दीत शशिकांत शिंदे यांचे कार्यालयाचे पाठीमागे असणा-या पत्र्याच्या बंदीस्त शेडमध्ये एकूण सात जण हे तीनपानी पत्त्याचा जुगार खेळताना मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवून जुगाराच्या डावावरील रोख रक्कम, मोबाईल फोन, वापरलेली वाहने व इतर मुद्देमाल असा एकुण ०६,३६,८१० (अक्षरी सहा लाख छत्तीस हजार आठशे दहा रूपये) एवढ्या किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. सदरबाबत कामशेत पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील कामशेत पो.स्टे चे तपास पोसई चव्हाण करीत आहेत.

सदर कारवाई पोलिस अधिक्षक अंकीत गोयल, अपर पोलिस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी, लोणावळा विभाग, सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली पोसई शुभम चव्हाण, पो.हवा अंकुश नायकुडे, पो. ना. राजु लांडे, पो. शि अंकुश पवार, पो.शि. अमोल ननवरे, पो. शि. पवन डोईफोडे यांचे पथकाने केली आहे.

लोणावळा ग्रामीण भागातील घरफोडी चोरी २ तासामध्ये उघड…

लोणावळा येथे टपरी धारकांवर सत्यसाई कार्तिक यांची कारवाई…

लोणावळा येथे गोंधळ घालणाऱ्यांवर पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तीक यांची कारवाई…

लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…

लोणावळा परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…

पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांची दारु वाहतूकीवर मोठी कारवाई…

The post लोणावळा येथे सत्यसाई कार्तिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरूच… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka