Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी.

महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी.

जालना: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून महाराष्ट्रातील युवकाने यश मिळवले आहे. भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे राहणाऱ्या एका मजुराच्या मुलाने UPSC परीक्षेत उतीर्ण होत IPS पदाला (IPS) गवसणी घातली आहे.

भोकरदन येथील भिकन रोजेकर (वय २६) याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये 812वा रँक घेऊन अतिशय कष्टातून शिकवणाऱ्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे. या स्वप्नपूर्तीनंतर, भिकनच्या या यशामुळे तो राहत असलेल्या त्याच्या पत्र्याच्या शेडमधील घरात मोठा आनंद उत्सव पाहायला मिळत आहे. भिकनचे प्राथमिक शिक्षण हे गावातच झाले असून महाविद्यालयिन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथे झाले आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे एका एनजीओच्या माध्यमातून त्याने दिल्ली येथे राहून यूपीएससीचा अभ्यास केला. युपीएससीच्या परीक्षेत त्याला अनेकवेळा अपयश आले. मात्र, सहाव्या प्रयत्नात त्याने अखेर हे यश संपादन करत स्वत:ची आणि आई-वडिलांची स्वप्नपूर्ती केली. भिकनचे वडील जगन रोजेकर यांनी दुसऱ्याच्या शेतात राबून भिकनच्या शिक्षणाला पाठबळ दिले आहे.

आई-वडिलांचे अपार कष्टानेच आपल्याला प्रेरित केले. त्यासोबतच, मित्र आणि नातेवाईकांनीही आपल्याला साथ दिल्यामुळे आपण हे यश मिळवल्याचे भिकनने प्रसार माध्यमांशी बोलातना म्हटले आहे. आपल्या लेकाच्या खांद्यावर आता खाकी वर्दी येणार, मुलगा IPS अधिकारी होणार असल्याने, मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्य कष्टात घालवलेल्या त्याच्या आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. भिकन रोजेकर याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka