Dailyhunt
महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले.

महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले.

लातूर : लातूरमध्ये स्कुटीवरून ट्रिपलसीट निघालेल्या युवतींना महिला कॉन्स्टेबलने अडवून चांगलच झापले आहे. संतप्त महिला वाहतूक पोलिसाने या मुलींना आधी बडवलं आणि नंतर सुनवले देखील. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

जीव लई वर झाला का… रेस गाडी चालण्याचे लायसन्स मिळालं का? असा जाब विचारत महिला कॉन्स्टेबलने तीन युवतींची भर रस्त्यावर तुफान शाब्दीक धुलाई केली. वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचे नाव प्रणिता मुसणे आहे. युवती आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी युवतींना खडे बोल सुनवाल्याचे काही नेटिझन्सचे म्हणणे आहे तर त्यांचे हे वर्तन चुकीचे असल्याचेही काहीजण बोलत आहे.

लातूर शहरातील एका मुख्य रस्त्यावरुन तीन युवती स्कुटीवरुन बेफाम निघाल्या होत्या. कर्तव्यावर असलेल्या वाहतूक शाखेच्या महिला कॉन्स्टेबलला ही बाब लक्षात आली. त्यानंतर, बराच वेळ त्यांचा पाठलाग करून त्या तीन युवतींना पोलिसांकडून अडवण्यात आले. त्यानंतर वाहतूक शाखेतील महिला कर्मचाऱ्यांचा संताप अनावर झाला होता. त्या तीन युवती हाताला लागल्यानंतर महिला कॉन्स्टेबलने तिन्ही युवतींना भर रस्त्यावरच चापटांचा प्रसाद दिला.

गाडी कशी चालवता… कसं बसता… घरी सांगून आलात का… अपघात झाला, तुम्ही जर मेलात तर घरच्यांनी कोणाकडे पाहायचे… तुझ्या बापाचा नंबर दे, फोन लाव तुझ्या आईला… अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती या महिला कॉन्स्टेबलने सुरू केली होती. त्यावर, आमचं चुकलं म्हणून त्या तीन युवती गयावया करत होत्या. मात्र, वाहतूक शाखेच्या महिला कर्मचाऱ्यांचा संताप काही केल्या कमी होत नव्हता. हा सर्व घटनाक्रम मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

दरम्यान, युवतींनी बेफाम गाडी चालवली हे जेवढं सत्य तेवढेच संतापलेल्या महिला कॉन्स्टेबल मुलींना भर रस्त्यावर मारहाण केली हे ही सत्य आहे. त्यामुळे, या घटनेवर आता दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येत आहेत. कोण म्हणतं मुलींची चूक होती… त्यांना रस्त्यावर असं मारत अपमान करणे योग्य नव्हे, महिला कॉन्स्टेबलची चूक झाली, असेही काहींचे म्हणणे आहे. कोण म्हणत आहे की, महिला कॉन्स्टेबलचं बरोबर आहे. या चर्चा आणि तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करणारे नेटीझन्स पाहायला मिळत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

29)पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

30)पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!

The post महिला कॉन्स्टेबलने बेफामपणे ट्रीपलसीट जाणाऱ्या युवतींना पकडले अन् सुनावले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka