Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा.

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा.

हमदनगर : अहमदनगरमधील एका महिलेच्या खात्यामधून एका क्षणात लाखो रुपये गायब झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिवानी वाघ यांचे एका बँकेमध्ये खाते असून, त्या त्याच बँकेच क्रेडिट कार्ड वापरतात. त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीचा फोन आला आणि म्हणाला की, ‘तुम्ही वापरत असलेल्या क्रेडिट कार्डचे रिवॉर्ड पॉइंट तुमच्या खात्यावर जामा करायचे आहेत, त्यासाठी तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगा.’ शिवानी वाघ यांनी आपल्या मोबाईलचा ओटीपी त्या व्यक्तीला सांगितला. पुढच्या क्षणात त्यांच्या मोबाईलवर तीन लाख रुपये डेबीट झाल्याचा मेसेज आल्यामुळे त्यांना धक्का बसला.

दरम्यान, शिवानी वाघ यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

The post महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka