Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई विमानतळावर डीआरआयच्या कारवाईत १०.७५ कोटींचे सोने जप्त

मुंबई विमानतळावर डीआरआयच्या कारवाईत १०.७५ कोटींचे सोने जप्त

मुंबईः मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. महसूल संचालनालयाच्या गुप्तचर खात्यातर्फे (डीआरआय) राबविण्यात येत असलेल्या 'ऑपरेशन मिडनाईट गोल्डस्ट्राईक' अंतर्गत मोठी कारवाई करत २४ कॅरेट शुद्धतेची सोन्याची धूळ मेणाच्या स्वरूपातील ६.८५९ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

या सोन्याची किंमत अंदाजे १०.७५ कोटी रुपये इतकी असल्याचे या खात्यातर्फे सांगण्यात आले.

या प्रकरणी विमानतळ कर्मचाऱ्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी ५ जण बांगलादेशकडे जाणारे ट्रान्झिट प्रवासी असल्याची माहिती आहे. दुबई-बँकॉक-माले मार्गावरील प्रवाशांचा तस्करीसाठी वापर करण्यात येत असून, विमानतळातील कर्मचाऱ्याच्या मदतीने सोन्याची बेकायदेशीरपणे तस्करी काढण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईत एकूण १६ कॅप्सूलमध्ये सोन्याची धूळ आढळली असून डीआरआयतर्फे पुढील तपास चालू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka