मुंबई : मुंबई विमानतळावर परदेशातून सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन परदेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. या सोन्याची किंमत तब्बल 19 कोटी 15 लाख एवढी आहे, अशी माहिती कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई विमानतळ सीमा विभागाने 19.15 कोटी रुपयांचे 32.79 किलो सोने जप्त केले आहे. केनियन देशातील या दोन महिला प्रवाशांच्या आतील पोशाखात आणि साहित्यामध्ये हे सोने लपवून भारतात आणले होते. नैरोबीमधील एका फ्लायरला रोखण्यात आले आणि तिच्या अंडरगारमेंट्स आणि बॅगेजमध्ये 6.60 कोटी रुपये किंमतीचे सोन्याचे 28 तुकडे सापडले. दुसऱ्या प्रकरणात नैरोबीच्या दुसऱ्या फ्लायरकडे तिच्या अंतर्वस्त्रांमध्ये आणि साहित्यात 12.54 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या बारचे 70 तुकडे आढळून आले आहेत.

पोलिसांनी दोन्ही महिला प्रवाशांना अटक केली असून, त्यांना सोन्याचा पुरवठा कोणी केला आणि हे सोनं मुंबईला कोणाला देणार होते याचा तपास सध्या कस्टम विभागाचे अधिकारी करत आहेत.
The post मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

