मुंबई : मुंबईतील आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीने 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विकास रस्तोगी आणि राधिका रस्तोगी या आयएएस दाम्पत्याच्या मुलीने मंत्रालयासमोर असलेल्या सुरुची या इमारतीवरुन पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
घटनास्थळी सुसाईड नोट देखील सापडली आहे. तीने आत्महत्या का केली? याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आयएएस अधिकारी विकास रस्तोगी यांची मुलगी लिपी रस्तोगीने मंत्रालयासमोर असलेल्या इमारतीच्या 10 मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. लिपी रस्तोगी ही एलएलबीचे शिक्षण घेत होती. लिपीचे आईवडील दोघेही आयएएस अधिकारी आहेत. वडील विकास रस्तोगी हे सध्या शिक्षण विभागाचे सचिव आहेत तर आई राधिका रस्तोगी या मुद्रा विभाग सचिव आहेत. घटनास्थळी एक सुसाईड नोट आढळून आली आहे, त्यामध्ये लिपी डिप्रेशनमध्ये असल्याचा उल्लेख आहे.
विकास रस्तोगी हे १९९७ च्या आयएएस बॅचचे अधिकारी आहेत. लिपी रस्तोगी ही अभ्यासात तितकीशी पुढे नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात होती. आई-वडील इतके मोठे अधिकारी असून आपण त्यासाठी पात्र आहोत की नाही, अशी भीती लिपी रस्तोगीला सतावत होती. त्यातूनच तिने आयुष्य संपवल्याची चर्चा मंत्रालय परिसरात चर्चा आहे. दरम्यान, सध्या पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…
MPSC स्पर्धा परीक्षेत 3 गुण कमी पडल्यामुळे युवकाची आत्महत्या…
सचिन तेंडुलकर याच्या सुरक्षा व्यवस्थेतील जवानाची आत्महत्या…
पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

