पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील मुंढवा पोलिस ठाणे हद्दीत दरोडा घालण्याचे प्रयत्नात असलेल्या चार आरोपींना गजाआड करण्यात मुंढवा पोलिसांना यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे मार्गदर्शक सुचना प्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, मुंढवा पोलिस ठाणे यांनी ०७/०२/२०२४ रोजी २१/१५ वा.
पोलिसांनी घटनास्थळी आडबाजूस थोड्या अंतरावर थांबून, कानोसा घेवून खातरजमा केली असता "आज पंपाची सारी कॅश लुटायचीच, अजुन थोडी लोकांची ये-जा कमी झाली की निघु" अशा प्रकारची चर्चा चालू असल्याने सदर इसमांचा पेट्रोलपंचावर दरोडा घालण्याचा विचार असल्याची खात्री झाली. तेव्हा सहा. पोलिस निरीक्षक, विलास सुतार यांचे इशाऱ्याप्रमाणे त्यांना ताब्यात घेणेसाठी दोन्ही बाजुने येवून पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना चाहूल लागल्याने ते पळून जाणेचे तयारीत असतानाच चार जण मिळून आले व इतर तीन जणांनी अंधाराचा फायदा घेत मैदानातून दिसेल त्या दिशेने पळ काढला, मिळून आलेले हे पोलिस ठाणे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे निदर्शनास आले आहे.
१) हर्षवर्धन ऊर्फ लकी मोहन रेड्डी, वय १९ वर्षे, रा. लोणकर वस्ती चौक गल्ली नं. ३, केशवनगर मुंढवा पुणे,
२) कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे, वय १९ वर्षे, रा. मयुरेश्वर कॉलनी नागपुरे यांची बिल्डींग दत्त मंदीराजवळ जांभळे प्लॉट केशवनगर मुंढवा पुणे,
३) तेजस ऊर्फ सन्नी अश्विन पिल्ले, वय २० वर्षे, रा. व्हॅल्यू शाळेशेजारी शिंदेवस्ती केशवनगर पुणे
४) शशांक श्रीकांत नागवेकर, वय २० वर्षे, रा. सुशिल सिध्दी सोसायटी फलॅट नं. ३९, हनुमान नगर रेणुकामाता मंदीराजवळ केशवनगर मुंढवा पुणे तसेच ०३ जण पळुन गेले असल्याचे सांगितले.
सदर ठिकाणी वरील आरोपींची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये तलवार, लोखंडी कोयता, एक लोखंडी रॉड, एक लोखंडी पाईप, मिरची पुड असलेली पिशवी, नारंगी रंगाची रस्सी इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. ताब्यातील इसमांना विश्वासात घेवून तपास केला असता त्यांनी झेड कॉर्नर येथील लोणकर पेट्रोल पंप उशीरा रात्री लोकांची ये-जा कमी झालेवर पंपावर जावून दिवसभराची जमा असलेली रक्कम लुटून घेवून जाण्याची आखणी व तयारी केली असल्याचे सांगितले त्यांना पुढील कार्यवाही करीता मुंढवा पोलिस ठाणे येथे घेवून येवून गुन्हा रजि. नंबर ५२ / २०२४ भा.दं.वि. कलम ३९९, ४०२, आर्म अॅक्ट कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलिस अधि कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे कायदेशिर कारवाई करण्यात आली आहे.
अटक आरोपींचे पुर्व रेकॉर्ड :
१) कुलदीप ऊर्फ कुणाल संजय साळुंखे वय १९ वर्षे, रा. शेख यांचे खोलीत ससाणे कॉलनी, केशवनगर मुंढवा पुणे याचे विरुद्ध् दखलपात्र ०४ गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.
२) हर्षवर्धन मोहन रड्डे / रेड्डी वय १८ वर्षे रा. लोणकर चौक केशवनगर मुंढवा पुणे याचे विरुद्ध दखलपात्र १३ गुन्हे.
३) तेजस ऊर्फ सनी अश्वीन पिल्ले वय १९ वर्षे रा. शिंदेवस्ती केशवनगर मुंढवा पुणे. याचे विरुद्ध दखलपात्र ०१ गुन्हे, अदखलपात्र ०२ गुन्हे.
४) शशांक श्रीकांत नागवेकर वय २० वर्षे रा. फ्लॅट नं. ३९ पाचवा मजला सुशील सिध्दीक सोसा हनुमाननगर केशवनगर मुंढवा पुणे यांचे विरुद्ध दखलपात्र ०२ गुन्हे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पुणे शहर, अपर पोलिस आयुक्त, रंजन कुमार शर्मा, पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे सुचनांप्रमाणे, पोलिस उप आयुक्त, आर राजा, परिमंडळ – ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त, आश्विनी राख, हडपसर विभाग पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, मुंढवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, महेश बोळकोटगी, सहा. पोलिस निरीक्षक, विलास सुतार, सहा. पोलिस निरीक्षक, संदीप जोरे, पोलिस उपनिरीक्षक, धनंजय गाडे, सहा. पोलिस फौजदार, संतोष जगताप, पोलिस अंमलदार दिनेश भांदुर्गे, संतोष काळे, दिनेश राणे, राहूल मोरे, मोहन सारुक, दिपक कदम, प्रमोद जगताप, सचिन पाटील, स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे यांनी केली आहे.
मुंढवा पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्यास २४ तासात केली अटक…
मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया…
मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…
मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…
मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post मुंढवा पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला केले गजाआड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

