पुणे (संदीप कद्रे): खूनाचा प्रयत्न करुन गेल्या २ महिन्यांपासून फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
मुंढवा पोलिस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर ३६७ / २०२३ भा.द.वि कलम ३०७, ५०४, ५०६ सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) (३) १३५ सह आर्म अॅक्ट कलम ४(२५)सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ प्रमाणे दाखल गुन्हयातील आरोपी अनुप ढगे (वय २३, रा.
सदरची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना कळविली. त्यांनी लगेचच तपास पथकातील अधिकारी सपोनि संदिप जोरे यांना स्टाफसह बातमी ठिकाणी जावून आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश दिले. सपोनी जोरे व स्टाफ यांनी मिळालेल्या बातमी प्रमाणे अत्यंत शिताफिने आरोपी अनुप ढगे (वय २३ वर्षे, रा. झेड कॉर्नरजवळ, केशवनगर पुणे) यास उरुळीकांचन येथील पीएमटी बस स्टॅन्ड येथे सापळा रचून ताब्यात घेतले आणि आरोपीस दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे अति कार्यभार सह पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, ए. राजा पोलिस उप-आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, संगिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक संदिप जोरे, पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे, पोहवा / ४१०२ दिनेश भांदुर्गे पोहवा/५४१८ संतोष जगताप, पोहवा / ४१५७ महेश पाठक, पोहवा झुरंगे, पोशी ४४४१ स्वप्नील रासकर पोशी ८२०८ हेमंत पेरणे, पोशी ८१४३ सचिन पाटील यांनी केली आहे.
मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…
मुंढवा पोलिसांनी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीच्या आवळल्या मुसक्या…
पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…
कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

