पुणे (संदिप कद्रे): वाईन शॉप फोडून घरफोडी करणारे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना मुंढवा पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
मुंढवा पोलिस ठाणे हददीत केशवनगर भागात विरांश वाईन्स हे दुकान २७/१२/२०२३ रोजी रात्री चार अज्ञात आरोपीने फोडुन दुकानातील रोकड व विदेशी दारुच्या बाटल्याचे बॉक्स असा एकुण ४,६०, ५७० /- रु चा मुददेमाल चोरुन नेला होता.
सदरची माहीती ही तात्काळ त्यांनी तपास पथकातील प्रभारी सपोनी संदीप जोरे यांना कळविली. त्यांनी सदरबाबतची गोपनीय बातमी वपोनी महेश बोळकोटगी यांना कळवुन त्यांनी लागलीच कारवाईचे आदेश दिल्यानंतर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी योग्य तो सापळा रचून संशयित दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना मुंढवा पोलिस स्टेशन येथे आणुन त्यांना विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी व त्यांच्या दोन साथिदारांनी मिळुन सदरचे वाईन शॉप हे दारुची विक्री करण्याचे उददेशाने फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत.
१) ओंकार ऊर्फ पल्या सुधाकर परमवार वय २४ वर्षे रा ९२ जुनाबाजार, नवी तालीम समोर खडकी पुणे
२) अरबाज मुनीर शेख वय १९ वर्षे रा घर नं ७७/२१ खडकी बाजार गोपी चाळ खडकी पुणे असे असुन दोन्हीही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.
आरोपींवर पुणे शहरात विविध पोलिस ठाणेस चोरीचे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अटक आरोपीस प्रथमवर्ग न्यायालय लष्कर कोर्ट पुणे यांनी २३/०१/२०२४ रोजी पर्यतची पोलिस कस्टडी दिलेली असुन पोलिस कस्टडीत आरोपीकडुन ३३,६००/-रुकिमतीची विदेशी दारु जप्त करण्यात आली असून, अटक आरोपीकडे गुन्हयातील रोकड बाबत अधिक तपास चालू आहे. आरोपीच्या इतर साथिदार यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.
सदरची कामगीरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, रामनाथ पोकळे अति कार्यभार सह पोलिस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, ए. राजा पोलिस उप- आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, अश्विनी राख, सहा. पोलिस आयुक्त हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली महेश बोळकोटगी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंढवा पोलिस ठाणे पुणे, श्रीमती सुनिता रोकडे, पोलिस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलिस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा पोलिस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोशि स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांनी केली आहे.
मुंढवा पोलिस स्टेशनच्या पोलिसकाकांमुळे युवकाचे वाचले प्राण…
मुंढवा पोलिस स्टेशनच्या वतीने रूट मार्च…
मुंढवा पोलिसांनी फरार असलेल्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेडया…
मुंढवा पोलिसांनी अल्पवयीन मुलाकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल केला हस्तगत…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post मुंढवा पोलिसांनी वाईन शॉप फोडणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेडया… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

