Dailyhunt
नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्.

नागपूर हादरलं! एकतर्फी प्रेमातून विवाहित शेजाऱ्याने युवतीला संपवलं अन्.

नागपूर: नागपूर शहरातील मानकापूर पोलिस स्टेशन हद्दीतील गोधणी येथे एकतर्फी प्रेमातून युवतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. प्राची खापेकर (वय २३) असे मृत युवतीचे नाव असून, शेखर ढोरे (वय 38) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी शेखर हा विवाहित असून मृत प्राचीचा शेजारी होता.

प्राची खापेकर ही गोधणी येथील कलेक्टर कॉलनीमधील राजलक्ष्मी सोसायटीत कुटुंबासह राहत होती. ती बी.ए.चे शिक्षण घेत होती. त्याचसोबत आरोपी शेखर ढोरे याच्या पत्नीबरोबर शिवणकामाचे कामही करत होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत शेखर याने प्राचीशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हेतू लक्षात येताच प्राचीने त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली होती. हीच गोष्ट शेखर याला सहन न झाल्याने मंगळवारी सकाळी, प्राचीच्या घरात कोणीही नसताना तो तिच्या घरी आला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. रागाच्या भरात शेखर याने प्राचीचा गळा दाबून हत्या केली. प्राचीचा मृत्यू झाल्याची खात्री होताच, शेखरने ओढणीचा फास बनवून तिचा मृतदेह सिलिंग फॅनला लटकावला आणि आत्महत्येचा बनाव रचत घटनास्थळावरून फरार झाला.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, प्राचीचे कुटुंबीय काही वेळाने घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी मानकापूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सुरुवातीला आत्महत्येचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र शवविच्छेदन अहवालात प्राचीच्या डोक्यावर गंभीर मार लागल्याचे तसेच गळ्यावर खुणा आढळून आल्याने हा खून असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी तपासासाठी शेखर ढोरे याला ताब्यात घेतले. कडक चौकशीनंतर शेखरने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. दिवसाढवळ्या युवतीची निर्घृण हत्या झाल्याने मानकापूर आणि गोधणी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.

एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करणारा आरोपी 10 महिन्यानंतर टॅटूमुळे गजाआड…

एकतर्फी प्रेम! मैत्रिणीने भेटण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर बोलावलं अन्…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka