Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नांदेड हादरलं! मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह.

नांदेड हादरलं! मित्राच्या रूमवर अभ्यास करण्यासाठी गेलेल्या युवतीचा आढळला मृतदेह.

नांदेड: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका युवतीचा संशयास्पद परिस्थितीत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शीतल मोरे असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पांगरी परिसरात राहणाऱ्या आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत अभ्यासासाठी जात असे.

मात्र, त्याच खोलीमध्ये शीतलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला आहे.

शीतलच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत अनेक नातेवाईक, सामाजिक संघटना आणि महिलांच्या संस्थांनी पोलिसांवर दबाव आणत तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर पोलिसांनी मध्यरात्री आरोपी माधव काळे याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला व त्याला अटकही केली आहे.

शीतलची हत्या करून तिने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. शीतलचा स्वभाव, तिची सध्याची मानसिक अवस्था आणि अभ्यासात असलेली प्रगती यांचा उल्लेख करत तिने आत्महत्या करणे शक्य नसल्याचेही कुटुंबीयांनी सांगितले. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शीतल मोरे आणि आरोपी माधव काळे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्या खोलीत शीतल वारंवार जात असे. मात्र, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाले किंवा शीतलला मानसिक त्रास दिला गेला का, याची सविस्तर चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पांगरी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

स्वप्न राहिले अपूर्ण! PSI परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या अश्विनी केदारी हिचा दुर्देवी मृत्यू…

पुणे शहरात दिवसाढवळ्या कॉलेज परिसरात युवकाची हत्या…

हृदयद्रावक! मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखा पुढे झाली अन् भाऊही पळत आला…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka