Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या.

नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या.

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात प्रेम प्रकरणातून एका युवकाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गेश्वर ठाकूर (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे.

मुलीच्या नातेवाईकांनी त्याला जाब विचारण्याच्या बहाण्याने बोलावून घेत ही हत्या केली. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.

बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी असलेला दुर्गेश्वर ठाकूर याचे थडीसावळी येथील एका युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांच्यात संतापाची लाट उसळली. मंगळवारी दुपारी आरोपींनी दुर्गेश्वरला थडीसावळी गावात बोलावून घेतले. आमच्या मुलीशी संबंध का ठेवतोस? असा जाब विचारत नातेवाईकांनी त्याला घेरले. संतापलेल्या आरोपींनी दुर्गेश्वरला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी आरोपींनी त्याच्या गुप्तांगावर लाथा मारल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. मारहाणीतच दुर्गेश्वरला उलट्या सुरू झाल्या आणि काही क्षणांतच त्याने जागीच प्राण सोडले.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कसून तपास करत एकूण सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये थडीसावळी गावातील ३ आणि शेजारील तेलंगणा राज्यातील चार आरोपींचा समावेश आहे. सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींची नावे पुढीलप्रमाणे…
1) पद्मसिंह गंगा सिंह ठाकुर
2) राजू सिंग गंगा सिंग ठाकूर
3) गंगासिंग हनुमानसिंग ठाकूर सर्व रा थडी सावळी
4) दिलीप सिंह ठाकुर
5) विजय सिंग ठाकूर
6) विशाल सिंह ठाकूर
7) प्रताप सिंग ठाकूर, सर्व राहणार निर्मल तेलंगणा

गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. “प्रेम प्रकरणातून झालेला हा खून अत्यंत दुर्दैवी असून, कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल,” असे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले आहे. या घटनेमुळे मुतन्याळ आणि थडीसावळी या दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्…

जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट; सोशल मीडियावरून प्रेम…

पुणे! प्रेमप्रकरणातून महिलेची आत्महत्या; कागदाचे तुकडे जोडत पोलिसांनी उकललं गूढ…

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka