Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय.

नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय.

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर एक 'गाठोडे' घेऊन जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. हे गाठोडे नक्की कशाचे होते?

त्यात काय होते? आणि त्याचा या गुन्ह्याशी काय संबंध आहे? या प्रश्नांच्या उत्तरासाठी पोलिस आता सखोल तपास करणार आहेत.

पुणे ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडल्यानंतर आरोपी भीमराव कांबळे हा घटनास्थळावरून पळ काढताना दिसत आहे. मात्र, यावेळी त्याच्या खांद्यावर एक मोठे गाठोडे असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली रक्ताने माखलेली कपडे किंवा हत्यार या गाठोड्यात दडवले होते का? असा सवाल उपस्थित होत आहे. गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने हे गाठोडे कोठे नेले, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

शवविच्छेदन अहवालात चिमुकलीच्या शरीरावर बोथट आणि टणक हत्याराने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीने हे हत्यार नक्की कोणत्या दुकानातून खरेदी केले किंवा कोठून मिळवले? तसेच त्या गाठोड्यात हेच हत्यार होते का? याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयात आरोपीच्या पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने गांभीर्य ओळखून आरोपीच्या कोठडीत १२ मे पर्यंत वाढ केली आहे. दरम्यान, राज्यात संतापाची लाट असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव आरोपीला ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka