नाशिक: नाशिकमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे तिसरं प्रकरण उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एका नामांकित आयटी कंपनीत काही महिलांवर तिथल्या वरिष्ठांनी लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात तब्बल ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सर्व आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
एका मल्टिनॅशनल IT कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण झाले आहे. तसेच एका तरुणावर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. २५ मार्च रोजी पहिल्यांदा तक्रार झालेल्या या प्रकरणाबाबत शहर पोलिसांनी अत्यंत गोपनीयता पाळली होती. याप्रकरणी २५ मार्च रोजी देवळाली कॅम्प येथे पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर २ एप्रिल रोजी ७ आणि ३ एप्रिल रोजी १ असे एकूण ८ गुन्हे मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यात २ गुन्ह्यांतील ५ संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
एका पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी पीडित युवतीला एका रिसोर्टवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपींनी आधी तिची मुलाखत घेतली होती. यानंतर त्यांनी तिची नोकरीसाठी शिफारस केली. नोकरी मिळाल्यानंतर ‘तुला माझ्यामुळेच नोकरी मिळाली, असं वारंवार सांगून उपकाराची भावना निर्माण केली. काही दिवसांनी तिच्यावर सुट्टी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. सुटीच्या दिवशी मुलींना विविध रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. तेथे जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणातील व्हिडिओंबाबत आला नवा ट्विस्ट…
नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

