Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले.

नाशिक! एकाच कुटुंबातील 4 जणांचे मृतदेह सापडले; मृतांमध्ये दोन चिमुकले.

नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे आज (रविवार) सकाळी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक पाहण्यात ही घटना आत्महत्येची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

मृतांमध्ये गोविंद बाळू शेवाळे (वय 40), त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळे (वय 35), मुलगी खुशी गोविंद शेवाळे (वय 8) आणि दीड-दोन वर्षांचा मुलगा श्याम गोविंद शेवाळे यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद बाळू शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे. तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे.

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलिस पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक यांच्यासोबत पोलिस कॉन्स्टेबल हे घटनास्थळी धाव घेतली. अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. कुटुंबाने असा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत अद्याप कारण समोर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

नाशिक! करोनात पतीचं निधन अन् महिलेचा अपघाती मृत्यू; 5 लेकरं…

नाशिक हादरलं! प्रेयसीसोबतचे अश्लील फोटो नवविवाहितेला दाखवले अन्…

नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…

नाशिक! गर्लफ्रेंडमुळे तीन वर्ष जगायला मिळाली; लव्ह यू अन् गूड बाय…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka