Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू.

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू.

नाशिक: सराईत गुन्हेगारांसह अमली पदार्थ बाळगणाऱ्यांच्या संपर्कात असल्याने सात महिन्यांपूर्वी नाशिक शहर पोलिस दलातून बडतर्फ केलेल्या तत्कालीन पोलिस कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे.

इरफान मन्सूर शेख (वय ३५, रा. वडाळागाव) असे मृताचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

इरफानने आत्महत्या केली, की नशेच्या ‘ओव्हर डोस’ मुळे त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला यासंदर्भातील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. भद्रकाली पोलिसांच्या हद्दीत असलेल्या एका लॉजमधील खोलीत शनिवारी (ता. ३१) रात्री उशिरा इरफानचा मृतदेह आढळला. रविवारी (दि. १) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. त्यावेळी इरफानच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होत नसल्याने ‘व्हिसेरा’ राखून ठेवण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी उशिरा तो परराज्यातून नाशिकमध्ये परतला होता. भद्रकाली हद्दीत एका लॉजमध्ये मुक्कामासाठी गेल्यावर हा प्रकार घडला.

‘ओव्हर डोस’ मुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. भद्रकाली पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद असून, तपास सुरू आहे. इरफान याच्या मागे वडील, पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. त्याचे वडील नाशिक पोलिस दलातून निवृत्त झालेले असून, त्याचे सख्खे व चुलतभाऊ शहर पोलिस दलात कार्यरत आहेत.

नाशिक शहर पोलिस :

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka