Dailyhunt
नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद.

नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद.

नाशिक: पुरातन सोने जमिनीत मिळाल्याचे खोटे सांगून ते खरे भासवून डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट - १ला यश आले आहे. पोलिसांनी एकूण १,६२,२०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मोहित कोतकर यांचा विश्वास संपादन करून त्यांना २२ ग्रॅम वजनाची माळ सोन्याची असल्याची सांगून त्यापोटी फिर्यादी यांचेकडुन २०,००० घेवुन फिर्यादी यांना खोटी सोन्याची माळ देवुन फिर्यादी यांची फसवणुक केली म्हणुन दोघांविरुध्द सातपुर पोलिस स्टेशन येथे गुरनं. २६/२०२४ भादविक ४२०, ४१७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.

सदर गुन्हा घडल्या नंतर फिर्यादी यांना सदरचे सोने खोटे आहे हे समजल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांच्या संपर्कातील गंगापुर पोलिस ठाणेच्या पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधला. त्यावर पोनि / सोनवणे यांनी त्यांना तात्काळ सातपुर पोलिस ठाणे येथे जावुन गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितले व पोनि/सोनवणे यांनी गुन्हयाचे गांभीर्य ओळखून सदर बाबतची माहिती ही गुन्हेशाखा युनिट क्र १ चे पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना दुरध्वनीवरून दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांनी तात्काळ गुन्हेशाखा युनिट क्र १ कडील अधिकारी व अंमलदार यांना सांगुन गुन्हयाच्या घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही फुटेज प्राप्त केले. सदर प्राप्त फुटेजद्वारे संशयित इसमांचा शोध घेण्याकरीता गुन्हेशाखा युनिट १ च्या अधिकारी व अंमलदार यांचे पथके तयार करून त्यांना नाशिक शहरात सदर इसमांचा शोध घेण्याकामी पाठविले.

सदर संशयितांचा शोध घेत असतांना गुन्हे शाखा युनिट क्र. १ चे पोलिस अंमलदार आप्पा पानवळ यांना फुटेज मधील संशयित व्यक्ती हे तवली फाटा येथे आढळून आले. त्यावर त्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांनी गुन्हेशाखा युनिट क्र १ कडील पोहवा / संदिप भांड, महेश साळुंके, पोना / मिलींद परदेशी, पोअं/ विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, नितीन जगताप, आप्पा पानवळ, राजेश राठोड अशांना बोलावुन घेवुन त्या सर्वांनी मिळून दोन मोटार सायकलीसह सदर तीन संशयितांना यांना ताब्यात घेतले. त्यांनी त्यांचे नावे
१ ) केशाराम पिता सवाराम, राह. बागरियोका वास, रानीवाडा, जिल्हा- सांचोर, राज्यस्थान.
२) बाबुभाई लुंबाजी मारवाडी, राह. आदीवाडा, मारवाडीवास, गांधीनगर, गुजरात.
३) रमेशकुमार दरगाराम राह. पोलिस ठाणा- बागरा, पो.स्टे. बागराच्या मागे, तहसिल- बागरा, जिल्हा – जालोर, राज्यस्थान असे सांगीतले. त्यांचेकडे अधिक चौकशी करता त्यांनी वर नमुद गुन्हयाची कबुली दिली व तसेच ते राजस्थानवरून महिनाभरापुर्वी येवुन ते सर्व तवली फाटाच्या जवळील एका मोकळ्या जागी पालाच्या झोपडया उभ्या करून त्यात ते राहत असल्याचे सांगितले. तेथे राहुन ते दिवसभर रेकी करून नागरीकांना हेरतात. नागरीकांना हेरून त्यांना आम्हाला जमिनीत खोदकाम करतांना पुरातन सोने सापडले असून ते आम्हाला कमी किमतीत विकायचे आहे असे सांगतो. हात चालाखीने आमचेकडे असलेले खरे सोने त्यांना दाखवून खोटे सोने देत असतो, अशी माहिती सांगुन गुन्हयाची कबुली दिली. पुढील तपासात त्यांचे झोपडीच्या पालातून गुन्हयात वापरलेले मोबाईल, मोटार सायकल, खोटया सोन्याच्या विविध वजनाच्या व विविध आकाराच्या सोन्या सारख्या दिसणा-या पिवळ्या धातुच्या माळा, वजनकाटा, रोख रक्कम, सन १९०० मधील जुने चांदीचे कॉईन, व ख-या सोन्याचे २ मणी असा एकुण १,६२,२००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपीनां पुढील कारवाई कामी सातपुर पोलिस ठाणेचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

नाशिक शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ज्या नागरीकांची अशा प्रकारे फसवणुक झाली असल्यास त्यांनी तात्काळ संबंधित पोलिस ठाणेशी संपर्क साधल्यास अशा प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, प्रशांत बच्छाव, पोलिस उप आयुक्त, गुन्हेशाखा, डॉ. सिताराम कोल्हे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हेशाखा नाशिक यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्र. १ नाशिक शहर कडील पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सपोनि/ हेमंत तोडकर, पोउपनि/ चेतन श्रीवंत, विष्णु उगले,सपोउनि / रविंद्र बागुल, पोहवा / संदिप भांड, महेश साळुंके, शरद सोनवणे, प्रविण वाघमारे, विशाल काठे, प्रदिप म्हसदे, रमेश कोळी, धनंजय शिंदे, देविदास ठाकरे, पोना / मिलींद परदेशी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, पो / विलास चारोस्कर, राहुल पालखेडे, नितीन जगताप, आप्पा पानवळ, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, राजेश राठोड, मपोअं / अनुजा येलवे व चालक नाझीम पठाण अशांनी केलेली आहे.

नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात…

नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka