नाशिक : प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणात आरोप झालेल्या डॉक्टर निलेश जेजुरकर यांना न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर ते काही काळापासून फरार असल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेत न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश दिले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ तारखेला होणार आहे. त्यामुळे सध्या त्यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!डॉ. मनिषा जेजुरकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी डॉ. निलेश जेजुरकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत मनिषा यांच्या आत्महत्येस तेच जबाबदार असल्याचा दावा केला आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.
दरम्यान, डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिकमधील जिल्हा रुग्णालय येथे मानसोपचार तज्ञ म्हणून कार्यरत आहेत. नाशिकमधील गंगापुर रोड परिसरातील डी. के. नगर येथे राहणाऱ्या डॉ. मनिषा जेजुरकर (वय ४०) यांनी ६ मार्च रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरात खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. घटनेनंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी सुमारे २.४० वाजता नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी गंगापूर पोलीस स्टेशनमध्य अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…
नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…
पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

