Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ!

नाशिकः पोलिस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षापासून रखडलेल्या बास्केटबॉल चे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाउंडचे गुरुवारी (ता. १) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले.

भूमिपूजनावेळी चंद्रकांत खांडवी पोलिस उपआयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर, डॉ. सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, मनोहर करंडे, रणजीत नलावडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशपाक शेख क्रीडा प्रमुख, कॉन्ट्रॅक्टर सुधीर घुले पोलिसांचे प्रशिक्षक विजेंद्र सिंग प्रेम गुरुग भोसले, कार्लोस थॉमस बाळकृष्ण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या दहा वर्षापासून रखडलेल्या सिमेंट कोण बास्केटबॉल मैदानाच्या कामास नव नियुक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे पोलिस अधिकारी कर्मचारी व पोलिस पाल्य यांच्याकरिता नवीन सिमेंट कोर्ट बास्केटबॉल मैदान तयार करण्याचे मूर्त लाभले आहे. पोलिस अधिकारी कर्मचारी व पोलिस पाल्य यांनी श्री. कर्णीक यांना बास्केटबॉल मैदान तयार करण्याची विनंती केल्यानंतर अवघे दहा दिवसात नवीन सिमेंट कोर्ट सिंथेटिक बास्केटबॉल मैदान तयार करण्यास शुभारंभ झाला.

सदर बास्केटबॉल च्या सिमेंट कोर्ट बास्केटबॉल च्या कामाकरिता पोलिस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर करंडे चुंचाळे पोलिस स्टेशन यांनी आघाडी घेऊन युद्धपातळीवर काम चालू केले आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक पोलिस आयुक्तालयाचा पदभार सांभाळण्यापासून पोलिस खेळाडूंसाठी अत्याधुनिक ऑलम्पिक वेटलिफ्टिंगचे साहित्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टिक खेळाडूंना शूज गोलकीपर कीट, सर्व कबड्डी वेटलिफ्टिंग रनिंग याकरता लागणारे उच्च दर्जाचे शूज, कुस्ती कस्टम, अथलेटिक्स स्पाईक पाणी सर्व खेळांचे नवीन साहित्याची मागणी करून खेळाडूंना पुरवल्याबद्दल खेळाडूंनी पोलिस आयुक्त यांचे आभार मानले आहेत.

नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन…

नाशिक पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांची मोक्का अंर्तगत कारवाई; पाहा आरोपींची नावे…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या व्हॉट्सऍप सेवेला मोठा प्रतिसाद…

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा 'सुरक्षित नाशिक' संकल्पनेवर भर…

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…

संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka