Dailyhunt
नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात.

नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात.

नाशिकः नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली असून, भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख (वय ३०) असे ATS ने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

न्यायालयाने आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे.

नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. आयसिस आणि इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनांना फंडींग आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपाखाली हुजेफ अब्दुल अजीज शेख याला अटक करण्यात आली. आरोपी उच्च शिक्षित असून आणि त्याच्या महाराष्ट्रात कंपन्या असल्याची माहिती आहे. शेखच्या साथीदारांच्या तपासासाठी कर्नाटक, बिहार, तेलंगणामध्ये एटीएसची पथकं रवाना झाली आहेत. आरोपीच्या घराच्या झडतीतून 7 मोबाईल फोन्स, लॅपटॉप आणि तीन जुने सिमकार्ड हस्तगत करण्यात आली आहेत.

संशयित शेख इसिसशी संबंधित महिलेला पैसे पाठवत असल्याचा आरोप आहे. नाशिक शहरात प्रथमच अशी घटना उघडकीस आली आहे. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानी महिलेच्या सांगण्यावरून आरोपीने पैसे पाठवल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत दहशतवाद विरोधी पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. आरोपी हुजेफ अब्दुल अजीज शेख याला 14 दिवसांची पोलिस कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालयाने त्याला 7 दिवसांची म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

शेखवर आरोप आहे की, एका महिलेच्या सांगण्यावरून त्याने काही पैसे बँकेच्या माध्यमातून वळते केले. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, तेलंगणा या राज्यात बँक खाते आहेत आणि या राज्यात त्याचा संपर्क दिसत आहे. बॅटल ऑफ बाबूस या २०१९ साली आयसिसच्या हल्ल्यात जे लोक दगावले, त्यांच्यावर जे लोक अवलंबून होते, त्यांना पैसे पाठवल्याचा आरोप आहे. या संशयिताच्या महाराष्ट्रात काही कंपन्या आहे. यात agro, product संबंधी कंपन्या आहे. राबिया उर्फ उम ओसामा या पाकिस्तानच्या एका महिलेच्या सांगण्यावरून त्याने हे पैसे पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

पुण्यात सापडलेल्या दहशतवाद्यांबाबत एटीएसची धक्कादायक माहिती…

देशभरात NIAचे ठिकठिकाणी छापे; आठ जण ताब्यात…

पुण्यात 'एनआयए'कडून आणखी एका दहशतवाद्याला अटक…

पुण्यातील संशयित दहशवादी प्रकरणात आणखी एक ताब्यात; युवती रडारवर…

The post नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka