Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार, बड्या बापाच्या मुलानं दोघांना उडवलं.

नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार, बड्या बापाच्या मुलानं दोघांना उडवलं.

नाशिक: पुणे येथील पोर्श कार अपघाताची आठवण करून देणारी घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. एका भरधाव चारचाकी गाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धक्कादायक म्हणजे ही कार चालवणारा चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे.

युवक दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांना भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की दुचाकीवरील दोघंही हवेत फेकले गेले. अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून पसार झाला होता, मात्र ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.


या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून संबंधित चारचाकी गाडीचा शोध लावला. अपघात करणारा मुलगा अल्पवयीन असून तो शहरातील एका शासकीय कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka