नाशिक : तपोवनातील केवडीबन परिसरात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी 72 तासात या प्रकरणाचा छडा लावला असून, कर्नाटकातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
पोलिसांनी सुटकेसमध्ये बॉडी सापडताच आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचे स्पष्ट झाले आणि अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र गोसावी यानेच हा खून केल्याची माहिती समोर आली. चारित्र्याच्या संशयातून प्रेयसीचा गळा आवळून खून करण्यात आला होता. मृतदेह बॅगेत टाकून केवडीबन परिसरात फेकला होता.
कल्याण-रत्नागिरी-गोवा मार्गे मंगळूरपर्यंत पाठलाग करून आरोपी गोपीनाथ गोसावीला अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला मुंबईमार्गे पळून गेलेला आरोपी कल्याण, रत्नागिरी, गोवा असा प्रवास करत कर्नाटकातील मंगळूर येथे पोहोचल्याची माहिती मिळाली होती.
आडगाव आणि उपनगर पोलिसांच्या संयुक्त पथकाने अहोरात्र पाठलाग करत मंगळूर येथील नार्थन पोलीस ठाणे परिसरातून आरोपीला ताब्यात घेतले चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. चारित्र्याच्या संशयातून घडलेला हा खून पोलिसांनी अवघ्या 72 तासांत उघडकीस आणत आरोपीला गजाआड केले आहे.
नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

