Dailyhunt
नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ.

नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ.

खनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी निघाली होती. मात्र, युवकाने रस्त्यातच वाहन थांबवले आणि नवरदेवासमोरच नवरीला घेऊन पळून गेल्याची घटना गाझीपूरच्या बिरनो पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे.

या घटनेमुळे नवरदेव आणि वऱ्हाडींना मोकळ्या हाताने परतावे लागले आहे.

नवरदेव ब्रिजेश कुमार आपल्या पत्नीला घेऊन जात होता. दुचाकीवरून आलेल्या एका युवकाने रस्त्यातच गाडी थांबवली आणि म्हटले की वधूच्या आईची प्रकृती खूपच गंभीर आहे, मी तिला भेटून लगेच परत आणतो. वरानेही विश्वास दाखवला आणि पत्नीला जाऊ दिले आणि गाडीत बसून तिची वाट पाहत राहिला. पण बरेच तास उलटूनही पत्नी परत आली नाही तेव्हा नवरदेव स्वतः त्याच्या सासरच्या घरी पोहोचला आणि तिथे गेल्यानंतर त्याला धक्काच बसला.

वधूने तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा आधीच कट रचला होता. तिचा प्रियकर त्याच गावातील एक विवाहित पुरुष आहे आणि तो तीन मुलांचा बाप आहे. हे संपूर्ण नाट्य प्रियकरानेच आखले आणि लग्नाच्या दिवशीच तिच्यासोबत पळून जाण्याचा कट रचला. वराला कल्पनाही नव्हती की ज्या मुलीसोबत त्याने सात फेरे घेतले होते ती आधीच दुसऱ्या कुणाच्या प्रेमात आहे.

या संपूर्ण घटनेनंतर वधूच्या वडिलांनी आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवरदेव ब्रिजेश कुमारने सांगितले की, त्याने लग्नात त्याच्या पत्नीला 2 लाख रुपयांचे दागिने दिले होते, हे दागिने घेऊन ती आता प्रियकरासोबत फरार झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने केला नवरदेवाचा खून…

हनिमूनच्या रात्री नवरी म्हणाली मला बॉयफ्रेंड आहे, हात लावायचा नाही…

धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…

नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…

हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…

The post नवरदेवासमोरच नवरीने तीन मुलांच्या बापासोबत काढला पळ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka