Dailyhunt
नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का.

नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का.

खनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीचे अनैतिक संबंध होते. प्रियकरासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात मोबाईलवर बेडवर राहिला. सासऱ्याने मोबाईल उघडल्यानंतर त्यांना धक्का बसला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील सहजनवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिनवा गावात ही घटना घडली आहे. गावातील एका युवकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी तो तरुण कामानिमित्तानं बेंगळुरूला गेला. पत्नीचे तिच्या माहेरच्या एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. ती तिच्या प्रियकराला फोन करून घरी बोलावून घ्यायची. सुरुवातीला कोणालाच तिच्या वागण्याचा संशय आला नाही, मात्र नंतर हे वारंवार होऊ लागल्यानं काही लोकांना संशय आला. तिचे सासरचे गोरखपूर शहरात राहतात. नवरीने रविवारी (ता. 8) रात्री प्रियकराला बोलावून घेतले होते. दोघांनी घरातून पळून जाण्याचा कट रचला. मध्य रात्री दोघांनी घरातू पळ काढला.

प्रियकराचा मोबाईल चुकून बेडवरच राहिला. सासऱ्याने मोबाईल उघडल्यानंतर त्यांना धक्का बसला. मोबाईलमधले नको ते फोटो आणि मेसेज दिसले. त्यानंतर जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. बेंगळुरूमध्ये कामासाठी गेलेला नवराही परत आला. त्याने पत्नीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पत्नीला आपण पसंत नव्हतो, तर तिनं लग्न का केलं?, असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे. नवरीच्या माहेरच्यांनी मात्र या गोष्टीबाबत आपल्याला काही माहिती नसल्याचे म्हटले आहे. तिनं स्वतःहून लग्नाला होकार दिला होता. त्यानंतरच लग्न ठरवण्यात आले होते, असे त्यांनी म्हटले आहे.

गोरखपूरमधील या घटनेमुळे परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. गावातल्यांना या गोष्टीचा संशय आला होता. त्यात घरात सापडलेल्या प्रियकराच्या मोबाईलमुळे त्याची खात्रीच पटली. पोलिस सध्या दोघांचाही शोध घेत आहेत.

हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…

नवरी लग्नानंतर एकच रात्र नवरदेवा सोबत राहायची अन् हळूच…

हनिमूनच्या रात्री इमारतीवरून नग्नावस्थेत पडून नवरीचा मृत्यू…

दिराला शेजारी झोपलेले पाहिले अन् नवरी हादरलीच; दोन महिने…

हनिमूनच्या रात्रीच नवरीला सुरू झाल्या उलट्या अन्…

The post नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka