यवतमाळः नवस फेडायला जाताना बेलगव्हान घाटात झालेल्या भीषण अपघातामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे.
यवतमाळमधील पुसद दिग्रस रोडवरील बेलगव्हान घाटात एक ॲपे (एम एच 29 -31172) पलटी झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण जागीच ठार झाले असून, दोघांचा उपचरादरम्यान मृत्यू झाला. इतर सर्व प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुसदच्या मेडिकेअर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. धुंदी, वसंतपुर, धानोरा गावातील 11 ते 12 जण नवस करण्यासाठी पोहरादेवी जवळील उमरी येथे जात होते. त्यावेळी अचानक पुसद दिग्रस रोडवरील बापूजी अणे स्मारकाजवळ अॅपे ऑटो पलटी झाला.
मृतांची नावे पुढीलप्रमाणेः
पार्वती बाई रमेश जाधव (वय 52, राहणार वसंतपूर),
ज्योतीबाई नागा चव्हाण (वय 50) राहणार धुंदी,
उषा विष्णू राठोड (वय 44) राहणार धुंदी,
लीलाबाई वसराम चव्हाण राहणार सिंगरवाडी,
गणेश वसराम चव्हाण (वय 62, राहणार जवाहर नगर),
सावित्रीबाई गणेश राठोड (वय 40)
चालक ज्ञानेश्वर गणेश राठोड व इतर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता मेडीकेअर हॉस्पिटल पुसद येथे तर काहींना नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post नवस फेडायला जाताना भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू; पाहा नावे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

