Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली.

नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली.

लोणावळा : विवाहानंतर लोणावळा येथे हनिमूनसाठी आलेले जोडपे फिरण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी सेल्फी काढताना पाय घसरल्याने माची प्रबळगडावरून खाली पडल्याने नवविवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शुभांगी विनायक पटेल (वय २४) असे मृत युवतीचे नाव आहे.

शुभांगी पटेल आणि विनायक यांचे वीस दिवसापूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर दोघे लोणावळा येथे हनिमून साठी 28 डिसेंबर रोजी आले होते. त्या ठिकाणाहून ते दुपारी 2 च्या सुमारास माची प्रबळ येथे ट्रेकिंगसाठी गेले. यावेळी शुभांगी सेल्फी काढत असताना पाय घसरला आणि ती वरून खाली पडली. हा सर्व प्रकार विनायक याच्या डोळ्यासमोरच घडला

शुभांगी अंदाजे दीड ते दोन हजार फूट खाली कोसळली असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. पोलिस आणि स्थानिकांच्या आणि निसर्ग मित्र यांच्या मदतीने या महिलेला बाहेर काढण्यात आले. यावेळी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले होते. तिला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी रात्री आठच्या सुमारास मृत घोषित केले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

The post नवविवाहीत महिला सेल्फी घेताना 2000 फूट दरीत कोसळली… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka