Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवविवाहितेच्या बेडरूममध्ये लावला छुपा कॅमेरे; कोणी पाहा.

नवविवाहितेच्या बेडरूममध्ये लावला छुपा कॅमेरे; कोणी पाहा.

नाशिक : नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात एका नवविवाहितेच्या पतीनेच बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून तिचे खासगी चित्रीकरण केले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने विनयभंग केल्याची खळबळजनक तक्रार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेचा विवाह झाल्यानंतर काही दिवसांपासूनच सासरच्या मंडळींनी क्षुल्लक कारणावरून तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वारंवार मारहाण करण्यात आली. तसेच तिच्यावर चोरीचा खोटा आळही घेण्यात आला. पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे की, पतीने बेडरूममध्ये छुपे कॅमेरे बसवले होते. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून तिचे खासगी फोटो काढण्यात आले. हे फोटो मॉर्फ (छेडछाड) करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पतीने आणि दिराने दिली. याच फोटोंचा धाक दाखवून दिराने पीडितेवर घटस्फोटासाठी दबाव टाकला आणि तिचा विनयभंग केला. सासूने तिला जेवणातून गुंगीकारक औषधे किंवा झोपेच्या गोळ्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. बेशुद्धावस्थेत असताना पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला.


पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

पीडित महिलेने या छळाला कंटाळून पोलिसांत धाव घेतली. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पतीविरुद्ध लैंगिक छळ, दिराविरुद्ध विनयभंग आणि सासू-सासऱ्यांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराच्या कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, छुप्या कॅमेऱ्यांच्या तांत्रिक पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.

नवऱ्याचे 19 महिलांशी अनैतिक संबंध, बेडरुमला स्पाय कॅमेरा लावला अन्…

निलेश चव्हाण याचे कारनामे उघड; फॅन, एसीमध्ये spy कॅमेरा अन् आक्षेपार्ह्य व्हिडिओ…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka