Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्.

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत, नको त्या व्यक्तीसोबत पाहिले अन्.

बुलढाणा: नवविवाहित युवती लग्नाच्या सहाव्याच दिवशी माहेरी परतली होती. नवविवाहितेला बापाने नको त्या अवस्थेत नको त्या व्यक्तीसोबत पाहिले आणि रागाच्या भरात लोखंडी रॉडने वार करून ठार केले.

प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा उघड केला आहे.

नवविवाहित युवतीने चुलत भावासोबतच्या अनैतिक संबंधामुळे संतापलेल्या वडिलांनी शीर धडावेगळं केलं आणि मध्य प्रदेशातून दुचाकीवरून येत बुलढाण्याच्या राजुरा शिवारात टाकले. एलसीबीच्या पथकानं या प्रकरणाचा छडा लावला आहे. 26 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव तालुक्यातील राजुरा शिवारात शीर कापून अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका युवतीचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी कोणताही ठोस पुरावा मिळत नव्हता. 1 मे रोजी म्हणजेच घटनेच्या सहाव्या दिवशी मध्यप्रदेशातील खकनार पोलीस स्थानकात शिवानी (वय २७) हिच्या मिसिंगची तक्रार दाखल झाली. तिच्या वडिलांनी बापूराव नत्थू कळमेकर (वय 55) यांनीच तक्रार दाखल केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकासोबत मध्य प्रदेश गाठले. पोलिसांनी 2 दिवस आरोपी बापूराव कळमेकर आणि मुलगा अजय कळमेकर यांच्यावर पाळत ठेवली. त्यानंतर विश्वासात घेऊन चौकशी केली असता बापूराव याने गुन्ह्याची कबुली दिली.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

बापूराव नत्थू कळमेकर याने पोलिसांना तपासादरम्यान सांगितले की, शिवानीचे त्याच्या मोठ्या जावयासोबत अनैतिक संबंध होते. पुढे तिचे चुलत भावासोबत सूत जुळले. समाजात बदनामी नको म्हणून तिचे विदर्भातील अमरावती जिल्ह्यात धारणी येथे लग्न लाऊन दिले. लग्नानंतर शिवानी माहेरी आली होती. नवरा तिला न्यायला आला असतानाच सर्व पाहुणे घराबाहेर झोपले होते. शिवानीने पुन्हा तिचा चुलत भाऊ अरुणला घरात बोलावले. दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर रागाच्या भरात लोखंडी रॉडने शिवानीवर वार करून तिला ठार केले. खुनाच्या दुसऱ्या दिवशी शिवानीचे प्रेत एका पोत्यात टाकून बुलढाणा जिल्ह्यातील जळगावच्या राजूर येथील जंगलात टाकले. ओळख पटू नये म्हणून तिथे तिचे शीर धडावेगळे केले, डोक्यावरचे केस कापले, कान, नाक कापून हातावर गोंदलेले अरुण नाव देखील कोयत्याने मिटवले आणि पेट्रोल टाकून प्रेत पेटवून दिले.

दरम्यान, पोलिसांनी तपास चक्रे फिरवत शिवानीचा खून करणाऱ्या बापाला आणि मदत करणाऱ्या भावाला मध्यप्रदेश मधून अटक केली आहे. हत्येच्या वेळी घटनास्थळावर हजर असलेला अरुण अद्याप पोलिसांना सापडला नाही. त्यामुळे या प्रकरणाला डबल मर्डर मिस्ट्रीची किनार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे अरुणचा शोध देखील बुलढाणा पोलिस घेताना दिसत आहेत. या प्रकरणातील खरी कहाणी अरुण हाती लागल्यानंतर स्पष्ट होणारच आहे. मात्र अरुणचाच पत्ता लागत नसल्याने अरुण सोबतही शिवानी प्रमाणे काही अनुचित तर घडलं नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन् तिचे दोन प्रियकर आले…

महिलेचे शेजाऱ्यासोबत प्रेमसंबंध अन् दोघांना नको त्या अवस्थेत पकडलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka