Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर.

पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योतीनंतर आता प्रियांका आली समोर.

वी दिल्लीः हरियाणातील प्रसिद्ध यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा हिच्या नंतर आता पाकिस्तानी गुप्तहेर प्रकरणाची लिंक ओडिसापर्यंत पोहोचली आहे.

याप्रकरणी गुप्तचर यंत्रणा आयबीने ओडिशातील प्रियांका सेनापती हिला ताब्यात घेतले आहे.

ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर ओडिशातील प्रियांका सेनापती हिला ताब्यात घेतले आहे. तिची अज्ञात स्थळी कसून चौकशी केली जात आहे. हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या ज्योती मल्होत्रासोबत तिचे कनेक्शन्स असल्याची माहिती पुरी पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. ज्योती मल्होत्रा हिची राज्य आणि केंद्रीय गुप्तचर अधिकारी संयुक्तपणे चौकशी करत आहेत.

ज्योती मल्होत्रा ही ‘ट्रॅव्हल विथ जो’ नावाचे एक लोकप्रिय YouTube चॅनेल चालवत होती आणि तिचे सुमारे 4 लाख सदस्य (सबस्क्रायबर्स) आहेत. भारत पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती असताना आता भारतात राहून पाकिस्तानशी हेरगिरी केल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ज्योतीचे पाकिस्तानातील अनेक अधिकाऱ्यांशी वैयक्तिक ओळख होती, अशीही माहिती समोर आली आहे.

ज्योती मल्होत्रा ​​पुरीमध्ये किती काळ राहिली? ती कोणत्या ठिकाणी गेली? प्रियांकाचे तिच्याशी किती काळ संबंध होते? तिने कोणते फोटो काढले आणि मंदिराबद्दल तिने काय चर्चा केली? पुरीनंतर ज्योती ओडिशातील इतर कोणत्या ठिकाणी गेली, याबद्दल प्रियांकाकडे चौकशी केली जात आहे. प्रियांका सेनापती देखील एक यूट्यूबर असून तीदेखील सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. ज्योती मल्होत्रा हिच्यानंतर हेरगिरी प्रकरणात तिचंही नाव समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता यात आणखी कुणाचा कनेक्शन समोर येऊ शकते, याचा तपास पोलिस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka