Dailyhunt
पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला.

पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला.

तिरुअनंतपुरम (केरळ): घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजले होते. शेजाऱ्याला गुपचूप घरात घुसताना विजेचा शॉक देऊन मारण्याचा आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विजेचा शॉक लागून शेजाऱ्याचा मृत्यू झाल्याचे तपासून त्याचा मृतदेह शेतात नेऊन टाकला होता. थंड डोक्याने करण्यात आलेली हत्या अखेरीस उघड झाली आहे. पोलिसांनी तिन जणांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

पती घराबाहेर जाताच शेजारच्या घरातील ५४ वर्षीय व्यक्ती नेहमी मागच्या बाजूने गुपचूप घरात प्रवेश करत होता. ही बाब पतीला शेजारच्या काही लोकांनी सांगितली होती. पण, पतीला यावर विश्वास बसत नव्हता. एके दिवशी त्याने घराबाहेर गेल्याचे नाटक केले व घराच्या परिसरातच लपून बसला. पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला जाताच तो हळूच मागच्या दरवाजाने घरात घुसला. हे पतीने पाहिले आणि त्याने शेजाऱ्याचा काटा काढण्याचे ठरविले. काही दिवसांनी घराच्या मागच्या भागात वाटेवर विजेच्या तारांचा रबर सोलून त्यात वीज प्रवाह सोडून ठेवला. यानंतर पती नेहमीप्रमाणे घराबाहेर गेला. घरातून पती बाहेर गेल्याचा मेसेज शेजाऱ्याला गेल्यानंतर तो मागच्या दाराने घरात येण्यासाठी निघाला. त्याचा पायांना त्या विद्युतभारीत तारांचा स्पर्श झाला आणि जागीच तो गतप्राण झाला. ही घटना केरळच्या अलपुझा येथे घडली आहे.

दरम्यान, संबंधित महिलेला एक मुलगी आणि मुलगा आहे. त्यांनी आधी तिला समजविण्याचा प्रयत्न केला. नंतर पतीनेही केला. परंतू, ती काही केल्या ऐकत नव्हती. यामुळे पतीने हा टोकाचा निर्णय घेतला व कट रचला. या कटात मुलगीही सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे. यामुळे पोलिसांनी पती, पत्नी आणि मुलीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

Video: महिला प्राध्यापिकेने वर्गातचं केलं विद्यार्थ्याशी लग्न…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

Video: पोलिसाने पकडले पत्नीला युवकासोबत रंगेहाथ अन्…

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

The post पत्नीसोबत होते शेजाऱ्याचे अनैतिक संबंध; सापळा रचला अन् जीव गेला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka