मुंबई : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या शांताराम (वय ८७) यांचे निधन झाले आहे. चित्रपती व्ही शांताराम यांच्या त्या पत्नी होत्या. 'झनक झनक पायल बाजे', 'दो आंखें बारह हाथ', 'पिंजरा' हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते.
'पिंजरा' या मराठी चित्रपटात त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
संध्या शांताराम यांचा जन्म 13 सप्टेंबर 1938 साली झाला. विजय देशमुख हे त्यांचे खरं नाव. 1959-60 च्या दशकात त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या. चित्रपती व्ही.शांताराम यांच्या प्रत्येक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. सध्या या त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या नृत्यासाठीही ओळखल्या जात होत्या. झनक झनक पायल बाजे या चित्रपटात 'अरे जा हट नटखट' या गाण्यात त्यांनी प्रसिद्ध शास्त्रीय नर्तक गोपीकृष्ण महाराज यांच्याबरोबर केलेले नृत्य सादरीकरण विशेष लोकप्रिय झाले होते. स्त्री आणि पुरूष व्यक्तिरेखा साकारून त्यांनी त्या गाण्यात नृत्य केले. ते गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नसल्याने, गाण्यात दिसणाऱ्या सर्व स्टेप्स संध्या यांनी स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी तयार केल्या होत्या.
हे गाणे आगळेवेगळे बनवण्यासाठी शांताराम यांनी सेटवर खरे हत्ती आणि घोडे आणले होते. अशा वातावरणात नाचणे अत्यंत धोकादायक असतानाही, संध्या यांनी निर्भयपणे परफॉर्म केले. प्राणी आवाज आणि गर्दीमुळे अस्वस्थ होऊ शकतात हे माहित असूनही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता शूटिंग केले. त्यांनी बॉडी डबल वापरण्यास नकार दिला आणि शूटिंगपूर्वी त्या प्राण्यांशी मैत्री करत स्वतःच्या हातांनी त्यांना केळी-नारळ खाऊ घातले आणि पाणी पाजले होते. त्यांचे हे समर्पण आणि धाडस पाहून व्ही. शांताराम प्रभावित झाले.
विवाहित असूनही शांताराम यांना संध्या यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि प्रखर प्रतिभेने भुरळ घातली. त्यानंतर संध्या यांनी शांताराम यांच्या अनेक नामांकित चित्रपटांत काम केले. 'झनक झनक पायल बाजे', 'दो आंखें बारह हाथ', 'नवरंग', 'पिंजरा' आणि 'अमर भूपाळी' यांसारखे चित्रपट त्यांचे आणि शांताराम यांच्या कलात्मक सहकार्याचे प्रतीक ठरले.
संध्या यांना त्यांच्या 'पिंजरा' या चित्रपटासाठी फिल्मफेअर मराठी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चंदनाची चोळी अंग जाळी या मराठी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.
Video: अभिनेत्री काजोल सोबत दुर्गा पूजेदरम्यान नको ते घडलं…
Video: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 33 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू…
अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन…
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या व्हिडीओने उडवली एकच खळबळ…
The post पिंजरा! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

