Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा 'सुरक्षित नाशिक' संकल्पनेवर भर.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा 'सुरक्षित नाशिक' संकल्पनेवर भर.

नाशिक (संदीप कद्रे): नाशिक शहर पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिक केंद्रीत पोलिसिंगवर भर दिला असून, त्यामध्ये आता 'सुरक्षित नाशिक' या संकल्पनेवर भर दिला आहे.

यामुळे नाशिककरांना ‘सुरक्षित नाशिक’चा अनुभव घेता येणार आहे.

नियंत्रण कक्ष, डायल ११२, पोलिस ठाणे, निर्भया पथक, दामिनी मार्शल्स या पथकांतील कर्मचाऱ्यांना ‘संभाषण कौशल्य आणि सार्वजनिक संभाषण या विषयावर प्रशिक्षिका सानिका कुळकर्णी यांनी मार्गदर्शन केले. सानिका कुळकर्णी यांनी आतापर्यंत महाराष्ट्र पोलिस दलात गडचिरोलीपासून मुंबईपर्यंत विविध विभागीय पोलिसांना अडीचशे प्रशिक्षण सत्रांत मार्गदर्शन केले आहे.

नाशिकमध्ये २५१ व्या कार्यशाळेचा टप्पा नुकताच झाला. त्यामध्ये पोलिसांना ‘सॉफ्ट स्किल ट्रेनिंग देण्यात आले. या स्वरूपाचे प्रशिक्षण पुढील टप्यातही सुरू ठेवत नागरिक केंद्रीत पोलिसिंग अधिक सुरक्षित व सुलभ करणार आहे. थेट नागरिकांशी संबंधित कार्यवाहीत पोलिस पथकांना अनेक अनुभव येतात. ते जाणून घेऊन कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडवितानाच, त्यांना संभाषण कौशल्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे ठरते. त्यानुसार प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे, असे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले.

संदीप कर्णिक यांनी स्वीकारला नाशिक पोलिस आयुक्तपदाचा पदभार!

नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या धडाकेबाज कारवाया सुरू…

Video: नाशिकमध्ये मद्यपान करणाऱ्यांना 'विशेष चेतावणी'…

पुणेकरांची मनं जिकली! संदीप कर्णिक नाशिकचे नवीन पोलिस आयुक्त!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

The post पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा ‘सुरक्षित नाशिक’ संकल्पनेवर भर… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka