Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताला रंगेहात पडकले, थेट बेड्या.

पोलिस अधिकाऱ्याला लाच घेताला रंगेहात पडकले, थेट बेड्या.

मुंबई : खार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक तुषार काळे यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले असून, अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईच्या पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एका प्रॉपर्टी प्रकरणात चौकशीचा अहवाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी तुषार काळे याने 3 लाख रुपयांच्या लाचेची मागणी संबंधिताकडे केली होती. त्यानुसार, ठरवल्याप्रमाणे तुषार काळे यास दीड लाख रुपयांचा पहिला हफ्ता देत असताना ACB ने रंगेहात पकडले आहे.

मुंबईतील वांद्रे न्यायालयात हे प्रकरण होते, त्याची चौकशी करण्यासाठी तुषार काळे याला सांगण्यात आले होते. मात्र, याप्रकरणी तक्रारदाराच्या बाजुने अहवाल देण्यासाठी पोलिस अधिकाऱ्याने लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदार आणि एबीसीच्या सतर्कतेमुळे तुषार काळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka