लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस अधिकारी त्याच्या वहिनीसोबत रोमान्स करत असताना पत्नीने रंगेहाथ पकडले. पत्नीने यानंत त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
पोलिस अधिकारी असलेल्या नवऱ्याचे मोठ्या जावेशी प्रेमप्रकरण सुरू असून, त्या दोघांना बेडरूममध्ये रंगेहाथ पकडले. दोघांना पकडल्यानंतर नवऱ्याने मारहाण केली. यानंतर दिरानेही तिच्याशी अश्लील चाळे केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. लखनौमधील महानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. महिलेच्या पहिल्या नवऱ्याचे निधन झाले होते. पहिल्या नवऱ्यापासून तिला एक मुलगाही आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती एकटी पडली होती. त्याच्यानंतर लखनौमधल्या पोलिस निरीक्षकासोबत तिची ओळख झाली. ओळखीचं प्रेमात रूपांतर झाले आणि त्यांनी लग्न केले.
नवरा असे वागेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. नवऱ्याला मोठ्या वहिनीसोबत बेडरूममध्ये पाहिल्यानंतर तिने त्याला विरोध केला. घडलेला प्रकार मोठ्या दीराला सांगितला; मात्र त्यांनीही समजून घेतलं नाही. उलट मोठ्या दीरानं तिच्याशी गैरवर्तन केले, असे महिलेने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिचा नवरा, मोठा दीर आणि जाऊ यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केली आहे. महिलेच्या वैद्यकीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणात कारवाई केली जाईल असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार दोघेही पोलिस आहेत. महिलेने गंभीर आरोप केल्यामुळे पोलिस त्याचा कसून तपास करत आहेत.
Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…
मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…
पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
Video: महिला पोलिस अधिकाऱ्यासोबत नवऱ्याला रंगेहात पकडले अन्…
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
The post पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

