नाशिकः नाशिकमध्ये झालेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव झाला आहे. नाशिक पोलिसांच्या बास्केटबॉल संघाने २४ वर्षाचा विक्रम मोडला आहे.
३४ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ ही ०४/०२/२०२४ ते १०/०२/२०२४ या कालावधीत नाशिक येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेचे यजमानपद महाराष्ट्र पोलिस अकॅडमी, नाशिक, नाशिक पोलिस आयुक्तालय, नाशिक शहर व पोलिस अधिक्षक कार्यालय, नाशिक ग्रामिण असे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आल्या होत्या. सदर स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील १३ घटकातील परिक्षेत्र व आयुक्तालय असे पुरुष व महिला संघ सहभागी झाले होते. स्पर्धेमध्ये सांघिक खेळ हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो तसेच महिलांचे सांघिक खेळ बास्केटबॉल, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल असे असुन वैयक्तिक खेळांमध्ये पुरुष व महिला ज्युदो, कुस्ती, बॉक्सिंग, स्विमिंग, वेटलिफ्टींग, पावरलिफ्टींग, बॉडीबिल्डींग, ॲथेलेटीक्स या खेळांचा समावेश होता.
स्पर्धेमध्ये नाशिक परिक्षेत्र संघात नाशिक पोलिस आयुक्तालय संघातील ५६ पुरुष खेळाडु व २६ महिला खेळाडू सहभागी झाले होते. सदर स्पर्धेमध्ये बास्केटबॉल या खेळात नाशिक आयुक्तालयातील पो.हवा. जावेद शेख (कर्णधार), कय्युम सैय्यद (उपकर्णधार), प्रकाश शिंदे, गजानन पाटील, मयुर धुम, सुरज धुम, मनोज भोये, प्रणय रुद्रवंशी यांनी उत्कृष्ट खेळांचे प्रदर्शन करुन कोल्हापुर संघाविरुध्द ७२ – ६० अशा १२ गुणांनी अंतिम बास्केटबॉल सामना जिंकुण सुवर्ण पदक २४ वर्षानंतर प्राप्त करुन विक्रम नोंदविला. तसेच वेटलिफ्टींग या पुरुष व महिला वैयक्तिक क्रीडा प्रकारात पारस देशमुख यांनी ९६ किलो वजनीगटामध्ये सुवर्ण पदक, मिनाक्षी तोंडे यांनी ८७+ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक, सोनाली काटे यांनी ७६ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक, भाग्यश्री कापडणीस यांनी ४५ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक, कुस्ती या क्रीडा प्रकारात राजश्री शिंदे यांनी ६५ किलो वजनीगटामध्ये रौप्य पदक, बॉडीबिल्डींग या क्रीडा प्रकारात संदिप निकम यांनी ७५ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक, पावरलिफ्टींग या क्रीडा प्रकारामध्ये अश्विनी भोसले यांनी ८४+ किलो वजनीगटामध्ये सुवर्ण पदक, पारस देशमुख यांनी ९३ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक, ज्युदो या क्रीडा प्रकारामध्ये सुनिता साबळे यांनी ७८ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये मिनाक्षी तोंडे यांनी ७५-८१ किलो वजनीगटामध्ये सुवर्ण पदक, तायक्वांदो या क्रीडा प्रकारामध्ये किशोरी देशपांडे यांनी ६५ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक तसेच वु-शु या क्रीडा प्रकारात कविता वर्पे यांनी ६९ किलो वजनीगटामध्ये कास्य पदक असे एकुण ०४ सुवर्ण पदक ०१ रौप्य पदक १० कास्य पदके प्राप्त करुन पोलिस आयुक्तालयाचे नाव उज्वल केले आहे.
सर्व विजयी खेळाडूंना सांघिक व वैयक्तिक खेळाचे प्रशिक्षण व मार्गदर्शन क्रीडा प्रमुख सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक अश्फाक शेख यांनी दिले आहे. वरील नमुद सर्व खेळाडुंना सांघिक व वैयक्तिक खेळांच्या सरावाकरीता पोलिस आयुक्त संदिप कर्णिक साहेब यांनी नविन ऑलंम्पिक दर्जाचे विविध क्रीडा साहित्य उपलब्ध करुन दिल्याने खेळाडुंमधील प्रोत्साहन वाढवून आयुक्तालयातील खेळाडुंनी सुवर्ण, रौप्य व कास्य असे एकुण १५ पदके प्राप्त केले आहेत.
Video: नाशिकमध्ये ३४व्या राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप!
नाशिकमध्ये पोलिस क्रीडा स्पर्धेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; संदीप कर्णिक यांच्याकडून उत्तम नियोजन…
नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: संदिप कर्णिक
नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक
नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

