Dailyhunt
पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना.

पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना.

रायगड: महाड तालुक्यातील एका पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याबाबत पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. आपला वरिष्ठांकडून जाणूनबुजून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच जातीवाचक शब्द वापरून हिणवलं जात असल्याचा आरोपही संबंधित पोलिस निरीक्षकांनी केला आहे.

रमेश तडवी असे पत्र लिहिणाऱ्या पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहित आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली आहे. मागील दोन वर्षात आपली दोन वेळा मुद्दाम बदली करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे पूत्र विकास गोगावले यांना सहकार्य न केल्याच्या कारणातून आपला मानसिक छळ केल्याचा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

रमेश तडवी यांनी पत्रात म्हटले की, महाड शहर पोलिस ठाणे येथे नगरपालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच शिवसेना शिंदे गट यांच्यात वाद झाला होता. या वादातून महाड शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी दोन गुन्हे दाखल झाले होते. गुन्हा रजि नंबर १७८/२०२५ मध्ये भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले हा आरोपी होता. त्याला सहकार्य करण्यासाठी अपर पोलिस अधिक्षक अभिजीत शिवधरे, उपविभागीय पोलिस अधिकारी महाड शंकर काळे, पोलिस निरीक्षक मिलींद खोपडे यांनी बनाव करून बेकायदेशीर तीन जणांना मला अटक करण्यासाठी सांगत होते. परंतु मी त्यांना अटक केली नाही. यामुळे त्यांना राग आला आणि त्यांनी माझी विनाकारण बदनामी करण्यास सुरवात केली.

मी सदर प्रकाराबाबत पोलिस अधिक्षक ऑचल दलाल यांना माहिती दिली होती. परंतु त्या देखील या कटामध्ये सहभागी असल्याने त्यांनी वरील लोकांचे ऐकून माझी काहीएक चूक नसताना फक्त मी खालच्या जातीचा आहे. या कारणास्तव माझी २०/०२/२०२६ रोजी महाड शहर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी ते नियंत्रणकक्ष अलिबाग अशी बदली केली आहे. सदर बदली आदेशामुळे मी तसेच माझे कुंटूब प्रचंड ताण तणावाखाली गेलेले आहे. माझ्यावर वांरवार होणारा अन्याय आता मला तसेच माझे कुंटूबाला सहन होत नसल्याने मी स्वताः तसेच माझ्यासोबत माझं कुंटूब असे आम्ही आत्महत्या करत आहोत, असे पत्रात लिहिले आहे. तसेच त्यांनी आपल्या आत्महत्येला कोण जबाबदार आहे, यांची नावे देखील त्यांनी पत्रात नमूद केली आहेत. या पत्रामुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…

पुणे पोलिस दलात एकच खळबळ! 32 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

पुणे पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आंध्र प्रदेशातून निलंबित पोलिसाला केली अटक…

नवी मुंबईतील पोलिस हवालदाराचं भयंकर कृत्य; प्रियकराला संपवलं अन् पुढे…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka