Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध.

पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध.

बुलढाणा : तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अखेर सांगाडा हाती लागला असून, क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत गुन्ह्याचा तपास केला आहे.

खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सविता नंदु धंदरे हिने आपला पती नंदू श्रीराम धंदरे ( राहणार गणेशपुर) हा बेपत्ता असल्याची फिर्याद दिली होती. प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तपास सुरु केला होता. पण, बेपत्ता व्यक्तीचा शोध लागत नव्हता. नूतन जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. अपर पोलिस अधिक्षक (खामगाव) अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी (खामगाव ) विनोद ठाकरे यांनीही तपासात लक्ष घालून हिवरखेड पोलिसांना वेळोवेळी उपयुक्त सुचना दिल्या. तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता नंदु श्रीराम धंदरे राहणार गणेशपुर, तालुका खामगाव) यांचा नव्याने शोध घेण्यासाठी हिवरखेड पोलिस ठाण्याचे विशेष तपास पथक तयार केले. यामध्ये सहायक पोलिस निरीक्षक कैलास चौधरी, पोलिस हवालदार विठ्ठल चव्हाण, नायक पोलिस जमादार प्रविण जाधव, पोलिस जमादार महेंद्र नारखेडे यांचा समावेश होता.

पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर नंदु धंदरे याचा मोबाईल, सर्व संशयीत लोकांचे मोबाईल क्रमाक, त्यांचे 'लोकेशन' व माहिती घेण्यात संकलित करण्यात आली. नंदु धंदरे याची सर्व माहिती काढण्याकरीता गोपनिय खबरीदार नेमण्यात आले. शिवाय, नंदु धंदरे याचेबद्दल माहिती देण्या-यास दहा हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले. गणेशपुर गावासह हिवरखेड पोलिस ठाणे परीसरात फलक लावण्यात आले होते.

खबऱ्यांकडून महत्वाची आणि निर्णायक 'टीप' मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार नंदु धंदरे व अतुल कोकरे या व्यक्तीचे एका महिलेसोबत अनैतिक प्रेमसंबध होते. त्यामुळे त्याचा घातपात झाला असावा व त्याचेबद्दल अतुल कोकरे याचा जिवलग मित्र दिपक शालीग्राम ढोके हाच माहिती देवू शकतो अशी पक्की खबर पथकाला मिळाली. हिवरखेड पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने दिपक ढोके व अतुल कोकरे यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली. खबरींनी दिलेल्या माहितीची पुष्टी झाल्यावर पथकाने संशयित दिपक शालीग्राम ढोके याला उचलले. त्याकडे नंदु श्रीराम धंदरे यांच्याविषयी विचारपुस केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. पुढे त्याने सांगीतले की, दोघांचे एकाच महिलेसोबत असलेल्या प्रेम संबंधातून नंदुचा मार्गातून काटा काढण्यात आला. नंदु धंदरे याची हत्या न केल्यास तो मला (ढोके) आणि अतुल कोकरे संपवून टाकेल या भीतीपोटी धंदरे याला कायमचे संपविण्याचा डाव या दोघांनी आखला.

अतुल गंगाराम कोकरे (वय ३० वर्षे गणेशपुर) याने मागील १८ ऑक्टोबर २०२२ रोजी शेतामध्ये फावडा, लाकडी दांडा आणि दगडाने नंदु श्रीराम धंदरे याची निर्घृणपणे हत्या केली. नंतर अतुल कोकरे आणि ढोके या दोघांनी मिळून अतुल कोकरे याच्या शेताच्या धुऱ्यावर धंदरे याचा मृतदेह पुरला. यानंतर मृत धंदरे याची मोटार सायकल मेहकर मार्गावरील पुलावरुन नदीत फेकुन पुरावा नष्ट केला.

आरोपींनी सांगितलेल्या शेताच्या बांधा खोदण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे हे घटनास्थळी हजर राहिले. शालीग्राम ढोके यांने कोकरे याचेसोबत प्रेत पुरल्याचे ठिकाण तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रदिप जाधव यांना पंचासमक्ष दाखविले. दंडाधिकारी यांनी छायाचित्रणासह समक्ष पंचनामा कारवाई करण्यात आली. यावेळी जमीनीत चार फुट खोलावर मानवी हाडांचा सांगाडा मिळुन आला. तो सांगाडा नंदु श्रीराम धंदरे याचाच असल्याचे साक्षीदार ढोके याने सांगीतले. याचदरम्यान आरोपी अतुल गंगाराम कोकरे यास त्याचे गाव गणेशपुर मधून ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी गणेशपूर येथील आरोपी अतूल गंगाराम कोकरे (वय ३०) व दिपक शालीग्राम ढोके वय (वय २३) यांचे विरुद्ध नंदु श्रीराम धंदरे याची हत्या आणि करुन संगणमत करुन पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार विठ्ठल चव्हाण यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. तपास सहायक पोलिस निरीक्षक कैलास चौधरी करीत आहेत.

प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…

बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…

विद्यार्थीनी 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली अन्…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

प्रेम प्रकरण! पती-पत्नी म्हणून ओयो हॉटेलमध्ये आले अन्…

The post पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka