Dailyhunt
प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह.

प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह.

मुंबई : प्रसिद्ध मल्याळम टेलिव्हिजन अभिनेत्री अपर्णा नायर (वय ३१) हिचा धक्कादायक अवस्थेत मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. अपर्णा तिच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेत्री अपर्णा तिच्या थलीयिल, करमाना येथील घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. प्रथमदर्शी तिने आत्महत्या केल्याचं दिसून आले आहे. अभिनेत्री अपर्णा नायरच्या झालेल्या धक्कादायक मृत्यूने तिच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसाला आहे. तिच्या मृत्यूमागे काही घातपात आहे का? याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलीस या घटनेचा पुढली तपास करत आहेत.

गुरूवारी (ता. ३१) रात्री 7.30 वाजताच्या सुमारास अभिनेत्री अपर्णा नायर तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. तिचा मृत्यू झाला तेव्हा तिची आई आणि बहिण घरीच होते. दोघींनी अपर्णाला तिच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत पाहिले. कुटुंबियांनी तात्काळ तिला रुग्णालयात नेले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेला नाही.

अभिनेत्री अपर्णा नायर हिच्या मागे पती संजित आणि थ्राया आणि कृतिका अशी दोन मुलं आहेत. तिने मेगाथीर्थम, मुधुगौव, अचयन्स, कोडथी समक्षणम बालन वकील, कल्कि या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. त्याचप्रमाणे चंदनमाझा आणि आत्मखी सारख्या मालिकेतही तिने महत्त्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन…

प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

अभिनेत्री अंकिता लोखंडे हिला पितृशोक…

अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…

हनी ट्रॅपप्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक…

The post प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka