Dailyhunt
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन.

मुंबईः छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे (वय ३८) हिचे मीरारोड परिसरातील निवासस्थानी निधन झाले. प्रिया मराठे हिला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचे निदान झाले होते.

मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. मात्र, अलीकडेच तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरु लागला. अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली.

प्रिया मराठे यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. प्रिया मराठे यांनी फक्त मराठी नाही तर हिंदी मालिकांमध्येसुद्धा काम करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 'कसम से', 'पवित्र रिश्ता', 'बडे अच्छे लगते हैं' यांसारख्या लोकप्रिय हिंदी मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. मराठीत 'चार दिवस सासूचे', 'तू तिथे मी' या मालिकांमध्ये काम केले. 'कॉमेडी सर्कस' या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांना खळखळून हसवले. सहजसुंदर अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांच्या मनात घर केले होते.

प्रिया मराठे हिचा जन्म २३ एप्रिल १९८७ रोजी ठाणे येथे झाला. २००६ मध्ये 'या सुखांनो या' या मराठी मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पहिल्याच भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि पुढे विविध मालिका व चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवली. प्रिया मराठे हिने अभिनेता शंतनू मोघे यांच्याशी 24 एप्रिल 2012 रोजी विवाह केला. त्यांनी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रियाला बॅडमिंटन, प्रवास आणि वाचनाची विशेष आवड होती. पिझ्झा, पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडते पदार्थ होते. त्याचबरोबर ती अध्यात्मिकतेतही आस्था ठेवायची. प्रिया मराठे हिचा अभिनय प्रवास हा मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रात महत्त्वाचा ठरलेला आहे. मराठी अभिनय क्षेत्रातील एक सुंदर जोडपं म्हणूनही यांच्याकडे पाहिले जात होते. अशातच आता प्रिया मराठेच्या अचानक जाण्याने अनेकांना धक्का बसला आहे.

अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची किरकोळ कारणावरून हत्या…

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर; मी पुन्हा लग्न करतोय…

अभिनेत्रीच्या एकुलत्या एका मुलाने 57व्या मजल्यावरून मारली उडी…

संजय कपूर यांच्या निधनानंतर अभिनेत्री करिश्मा कपूरची पहिली पोस्ट; म्हणाली…

अभिनेत्री प्रीती झिंटाने हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी केला मदतीचा हात पुढे…

The post प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिचे निधन… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka