Dailyhunt
प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे.

प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे.

बीड : लग्नास नातेवाइकांनी विरोध केल्याने अल्पवयीन मुलीचा प्रियकर असलेल्या मामाच्या मुलाने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा केल्यानंतर मुख्य आरोपी भगवान गायकवाड याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

त्याच्यावर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

घोसापुरी येथील अल्पवयीन मुलीचे तिच्या मामाच्या मुलाशी प्रेमसंबंध होते. मुलीचे वय कमी होते. तसेच मुलाला व्यसन असल्याने त्याच्यासोबत लाग्नास नातेवाइकांचा विरोध होता. आपले लग्न होणार नाही या भावनेतून भगवान याने आत्याच्या मुलीचा दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी भगवान वैजनाथ गायकवाड, वैजनाथ माणिक गायकवाड, बाळू माणिक गायकवाड, रमेश गव्हाणे, अंकुश विश्वनाथ माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी दोन आरोपी अटकेत आहेत. तिसरा भगवान याच्यावर उपचार सुरू आहेत. अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत.

भगवान याने प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला फोन करून घरापासून जवळच असलेल्या ओढ्याजवळ बोलावून घेतले व तिच्या डोक्यात दगड घालून खून केला. सदर मुलगी घरी उशिरापर्यंत न आल्याने तिच्या नातेवाइकांनी शोधाशोध केली. संशय आल्याने भगवान याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तो बंद येत होता. दरम्यान, आरोपी भगवान याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

सोलापूरच्या प्रियकराने प्रेयसीचे मुंडकं कापून फेकले नदीत…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…

महिलेने लॉजवर काढले युवकाचे कपडे अन् कापले गुप्तांग…

The post प्रेम! प्रेयसी असलेल्या मामाच्या मुलीला ओढ्याजवळ बोलावले अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka