Dailyhunt
प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्.

प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्.

पुणे: प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली देहूरोड येथील थॉमस कॉलनी परिसरात घडली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीला सापळा रचून अटक करण्यात आली आहे.

दिलीप मौर्या (वय 16, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) असे खून झालेल्या युवकाचे नावे आहे तर त्याचा अल्पवयीन चुलतभाऊ गंभीर जखमी झाला आहे. सनी सिंग (वय- 19, रा. गंभीरपूर, जि. गोपालगंज, बिहार) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आपल्या मैत्रिणीसोबत दिलीप याचे प्रेमप्रकरण सुरू असल्याचे सनीला समजले होते. त्यावरून त्याने बुधवारी (ता. 11) रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास दिलीप याला थॉमस कॉलनी येथील मोकळ्या मैदानात बोलावून घेतले. दिलीप याने त्याच्या चुलत भावाला सोबत नेले होतं. ते थॉमस कॉलनीमध्ये गेल्यानंतर, सनी सिंग अन् दिलीप यांच्यात प्रेमसंबंधांतून वाद झाला. त्यातून सनी सिंग याने दिलीप याच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यावेळी त्याच्या चुलतभावावरही वार केला. घटनेची माहिती मिळताच देहूरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दिलीप याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती तर आरोपी सनी सिंग हा खासगी कंपनीत कामाला आहे.

देहूरोड पोलिस आणि युनिट पाचची टीम मृत दिलीपची हत्या कोणी आणि का केली हे शोधण्यासाठी कसून तपास अन् शोध घेत होती. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की, दिलीपची हत्या प्रेमप्रकरणातून झाली आहे. दिलीप आणि त्याचा मारेकरी सनी सिंग राजपूत एका अल्पवयीन मुलीवर प्रेम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून तिने सनीशी बोलणे बंद केले होते आणि ती दिलीपच्या संपर्कात होती. दिलीपच्या संपर्कात असल्याने संतापलेल्या आरोपी सनी सिंग राजपूत थेट गुजरातमधून देहूरोड आला, तिथे त्याने दिलीपची हत्या केली. मृत दिलीपचा चुलत भाऊ अरुण मोर्या या चौदा वर्षीय मुलाच्या पोटात चाकूने वार करून सनी सिंगने त्यालाही गंभीर जखमी केले त्यानंतर तो गुजरातला पळून गेला.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला तेव्हा सनी सिंग राजपूतच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे सनी गुजरातमधील वडोदरा येथील एका स्टील कंपनीच्या गोदामात लपून बसल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने त्याला अटक केली. पोलीस खाक्या दाखवताच आरोपी सनी याने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुलीच्या अनैतिक संबंधांना वडिलांनी विरोध केला अन् नको ते घडलं…

पुणे! व्यावसायिक आणि नृत्याचे कार्यक्रम करणारी युवती लॉजवर गेले अन्…

पुणे जिल्हा हादरला! पत्नीला तीन मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यास पाडले भाग…

कोल्हापूर! प्रियकराने लॉजवर पत्नीसारखीच केली प्रेयसीची क्रूरपणे हत्या..

नवा ट्विस्ट! सोनमने नवऱ्यासमोर शरीरसंबंधासाठी ठेवली होती एक अट…

The post प्रेमाचा त्रिकोण! गुजरातचा प्रियकर थेट पुण्यात आला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka