Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमकहाणीचा 'एक दुजे के लिए' स्टाईलने झाला शेवट.

प्रेमकहाणीचा 'एक दुजे के लिए' स्टाईलने झाला शेवट.

मुंबई: नायगावमध्ये एका प्रेमी युगुलाने 'एक दुजे के लिए' स्टाईलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र वर्मा (वय 24) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याची प्रेयसी अल्पवयीन होती.

या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा आणि शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते. जितेंद्रला त्याच्या प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. त्यासाठी जितेंद्र प्रेयसीच्या पाठीशी लागला होता. जितेंद्र याची प्रेयसी शनिवारी त्याच्या घरी गेली होती. तेव्हादेखील जितेंद्रने तिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा आग्रह धरला. मात्र, तिने नकार दिला. यावरुन त्यांच्यात वाद झाला. ‘तू लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा, नाही तर मी आत्महत्या करेन’, अशी धमकी जितेंद्रने प्रेयसीला धरली. मात्र, जितेंद्रच्या प्रेयसीने त्याचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही आणि ती निघून गेली.

प्रेयसीकडून लिव्ह इनमध्ये राहण्याला नकार मिळाल्याने जितेंद्र वर्मा प्रचंड नैराश्यात गेला. याच नैराश्यातून शनिवारी रात्री जितेंद्र वर्मा याने घरातील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार समजताच जितेंद्रच्या प्रेयसीला मानसिक धक्का बसला. ती देखील नैराश्यात गेली. तिच्या कुटुंबीयांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती या धक्क्यातून सावरु शकली नाही. तिने दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरातील लोखंडी अँगलला नायलॉनची दोरी अडकवून गळफास घेतला. यामध्ये तिचाही मृत्यू झाला. पोलिसांकडून या घटनेचा पंचनामा करुन पुढील तपास केला जात आहे.

पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…

हृदयद्रावक! प्रेमविवाहाच्या साखरपुड्याला पाहुणे आले अन् अंत्ययात्रेला जावे लागले…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

प्रेमप्रकरण! युवकाला मारहाण करत घरापर्यंत आणले अन् युवकाने घेतला गळफास…

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka