लखनौ (उत्तर प्रदेश) : नवरा पत्नी आणि मुलीला सोडून आग्रा येथे प्रेयसीसोबत राहात असल्याची माहिती पत्नीला समजली होती. दोघे घरात एकत्र असल्याचे समजल्यानंतर पत्नीने दरवाजा वाजवायला सुरवात केली.
पत्नी बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावत राहिली, मात्र दोघेही बाहेर आले नाहीत. पत्नी सोबत तिची मुलगीही होती. घराबाहेर गोंधळ निर्माण झाल्यानंतर शेजारील नागिरक जमा झाले. नवरा दरवाजा उघडत नसल्यामुळे ताजगंज पोलिसांना पोलिसांना बोलावण्यात आले. घाबरलेल्या नवऱ्याने खूप प्रयत्नानंतर घराचा दरवाजा उघडला. संबंधित घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.
यश यादव हे मैनपुरीचे रहिवासी आहेत. यश हे समाजवादी पक्षाच्या सरकारमध्ये ब्लॉक प्रमुख होते. त्यांचे लग्न नेहा नावाच्या महिलेशी मैनपुरीमध्येच झाले होते. दोघांना एक मुलगी आहे. पत्नी नेहाने पती यश यादववर गंभीर आरोप केले आहेत. नेहाने पोलिसांना सांगितले की, ‘पतीने तिला मैनपुरीतील घरातून आग्रा येथे बिझनेस मिटींगसाठी जात असल्याचे सांगितले होते. पण, प्रत्यक्षात मात्र तो आग्रा येथील फ्लॅटमध्ये प्रेयसीसोबत राहत होता.’
‘नवरा प्रेयसीसोबत फ्लॅटवर राहत असल्याचे कळताच मी येथे आले. मी त्यांना फ्लॅटचा दरवाजा उघडण्यास बराच वेळ सांगितले. मात्र दरवाजा उघडला नाही. आपण अनेक तासांपासून फ्लॅटचा दरवाजा उघडण्यास सांगितलं, परंतु पती दरवाजा उघडत नव्हता. मी माझ्या मुलीला कुठे घेऊन जाऊ?' या गोंधळाबद्दल माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…
संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
प्रेयसीला फ्लॅटवर शेवटचं भेटायला बोलावलं अन्…
The post प्रेमप्रकरण! बिझनेस मिटींगसांगून प्रेयसीसोबत राहू लागला अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

