Dailyhunt
प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक.

प्रेमसंबंध! पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यू प्रकरणी महिला शिपायाला अटक.

खनौ (उत्तर प्रदेश): कानपूरच्या जालौन कोंच पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरुण कुमार राय असे जीव देणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.

महिला कॉन्स्टेबलने काही व्हिडिओ आणि चॅट्स सेव्ह करुन ठेवले होते, ते वापरून ती त्यांना सतत त्रास देत असल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी या महिला कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अरुण कुमार राय यांच्या मृत्यू प्रकरणात महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा हिला ताब्यात घेण्यात आले आहे. अरुण कुमार राय यांच्या पत्नीने दिलेल्या लेखी तक्रारीवरून तिची चौकशी केली जात आहे. मीनाक्षी आणि अरुण यांच्यात प्रेमसंबंध संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे.

महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांची 14 मार्च 2024 रोजी कोंच पोलिस ठाण्यात नियुक्ती झाली होती. 5 जुलै 2024 ला अरुण कुमार राय यांनी कोंच पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून पदभार स्विकारला. दोघेही सुमारे सात महिने एकाच पोलिस ठाण्यात एकत्र तैनात होते. या काळात, त्यांच्यातील जवळीक वाढल्याच्या चर्चा होत्या. 22 फेब्रुवारी 2025 ला अरुण यांची ओराई पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली, तर मीनाक्षीला 28 एप्रिल 2025 रोजी यूपी 112 युनिट- 1577 येथे पाठवण्यात आले. अरुण हे ओराईला गेल्यानंतर मीनाक्षीचे वर्तन बदलले. ती अरुण यांच्यावर विविध मुद्द्यांवरून सतत दबाव आणत होती. ती त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन वाद घालत होती. सततचा ताण, संघर्ष आणि दबाव यामुळे अरुण कुमार राय यांच्या मानसिक स्थितीवर मोठा परिणाम झाला होता.

अरुण कुमार राय यांची पत्नी माया राय यांनी महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. महिला कॉन्स्टेबल आणि स्टेशन इन्चार्ज यांच्यातील मोबाईल फोनवरील संभाषणाची नोंद देखील सापडली आहे. इतकंच नाही तर घटनेच्या काही काळापूर्वी, महिला कॉन्स्टेबलने तिची वर्दी मागण्यासाठी अरुण यांना फोन केला होता, माझी वर्दी द्या, मला घरी जायचे आहे, असे ती म्हणाली होती, अशीही माहिती आहे. घटनास्थळावरून एक पत्रही सापडले आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

जालौन येथील उरईच्या 2019 च्या बॅचमधील महिला कॉन्स्टेबल मीनाक्षी शर्मा ही एक कॉन्स्टेबल आहे.तिची जीवनशैली सामान्य महिला कॉन्स्टेबलपेक्षा खूपच वेगळी होती. मीनाक्षी अत्यंत आलिशान जीवन जगत होती. तिने काही दिवसांपूर्वीच तीन लाख रुपयांचा नेकलेस खरेदी केला होता. अरुण कुमार राय यांचा मृत्यू झाला तेव्हा मिनाक्षी तिथेच उपस्थित होती. ती सीसीटीव्ही फुटेजमध्येही दिसली होती. तसेच, पोलिसांनी तिचा फोनही जप्त केला आहे. मिनाक्षीचे कॉल डिटेल्स आणि चॅट्स अनेक गुपिते उघड करू शकतात.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रदीप कुमार वर्मा यांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवालात असे दिसून आले आहे की, त्यांच्या कानाच्या वर उजव्या कोपऱ्यात पिस्तूलने गोळी झाडण्यात आली. गोळी डाव्या बाजूने बाहेर पडली. शवविच्छेदन अहवालात एकच गोळी लागल्याचे दिसून आले. तीन डॉक्टरांच्या पॅनेलने शवविच्छेदन केले, ज्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले.

पुणे ग्रामीण पोलिस दलातील निखिल रणदिवे बेपत्ता होण्याचे कारण समोर…

लाखो रुपयांची लाच पडली महागात; PSI प्रमोद चिंतामणी अखेर बडतर्फ…

पोलिस आत्महत्या! प्रेमाचे दोन शब्द कधी तरी बोलली असती, तर..

प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…

पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकाचं प्रेमप्रकरण अन् बिंग फुटेल म्हणून…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka