Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्.

प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्.

खनौ (उत्तर प्रदेश): दीरानेच आपल्या वहिनीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वहिनीची हत्या केल्यानंतर आरोपी दीर नग्न अवस्थेत रस्त्यावरुन पळाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने पोलिस स्टेशनपासून 300 मीटर दूर अंतरावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

झांशी येथे ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

झांशीमधील प्रेमनगर येथे महेंद्र नावाच्या युवकाने आपल्या मावस भावाची पत्नी मायाच्या पोटावर, छाती, गळा आणि तोंडावर चाकूने हल्ला करुन गंभीर जखमी केले. हल्ल्यानंतर आरोपीने आपले रक्ताने माखलेले कपडे तिथेच काढून टाकले आणि नग्न अवस्थेत पळत सुटला. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने स्टेशनपासून 300 मीटर अंतरावर गळफास लावून घेतला. मायाचा उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

मायाच्या पतीने सांगितलं आहे की, ‘अहमदाबादमध्ये काम करत असताना त्याचे मायाशी लग्न झाले होते. पण मावस भावाचे पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याचं समजल्यानंतर झांशीला परतला होता. घटनेच्या दिवशी मी कामावर गेलो होतो. पत्नी स्वयंपाकघरात होती आणि छोटी मुलगी तिथेच जवळ खेळत होती. तेव्हा महेंद्र तिथे पोहोचला आणि हल्ला केला. यावेळी मायाने प्रसंगावधान दाखवत आपल्या मुलीला तिथून पळून जाण्याचा इशारा केला. जर मुलगी तिथून पळाली नसती तर त्याने तिचीही हत्या केली असती. मावस भावावर सर्वात जास्त विश्वास ठेवला, त्यानेच धोका दिला आहे. मी महेंद्रला ग्रामीण भागातून आपल्यासोबत अहमदाबादमध्ये आणले होते. घरात राहून त्याने धोका दिला आहे. झाशीला येऊन त्याला तीन महिनेच झाले असताना हे कृत्य केले.’

प्रेमनगर पोलिस ठाण्याचे प्रभारी तुलसीराम पांडे यांनी सांगितले की, ‘जखमी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपीने आधीच आत्महत्या केली असल्याने इतर कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.’ दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka